5.72 कोटी रुपये परत करण्याचे आदेश
पटियाला हाऊस फॅमिली कोर्टाने त्यांच्या एक्स पत्नीला तब्बल 5.72 कोटी रुपये परत करण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाचा हा निर्णय धवन यांच्यासाठी कायदेशीर लढाईतील मोठा विजय मानला जातोय. ऑस्ट्रेलियातील कोर्टाने दिलेला मालमत्ता वाटपाचा आदेश भारतीय कायद्यानुसार अवैध असल्याचे स्पष्ट करत कोर्टाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.
advertisement
ऑस्ट्रेलियन फॅमिली लॉ ॲक्ट 1975
ऑस्ट्रेलियातील फॅमिली कोर्टाने शिखर धवन याला त्याच्या एक्स पत्नीला मोठी रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र, भारतीय कोर्टाचे जज देवेंद्र कुमार गर्ग यांनी स्पष्ट केलं की, ऑस्ट्रेलियन फॅमिली लॉ ॲक्ट 1975 मधील 'प्रॉपर्टी सेटलमेंट' ही संकल्पना हिंदू मॅरेज ॲक्टच्या नियमांच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे परदेशातील असा कोणताही निकाल भारतीय नागरिकांवर आणि त्यांच्या इथल्या मालमत्तेवर बंधनकारक ठरणार नाही, असं न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय.
60 टक्के हिस्सा पत्नीला देण्याचा अधिकार
ऑस्ट्रेलियातील कायद्यानुसार पतीची सर्व मालमत्ता एका 'मॅरिटल पूल'मध्ये जमा केली जाते आणि कोर्टाला त्यातील 60 टक्के हिस्सा पत्नीला देण्याचा अधिकार असतो. शिखर धवन यांच्या बाबतीतही तेथील कोर्टाने अशाच प्रकारे 16.9 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, भारतीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश सार्वजनिक धोरणांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे धवन यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या पत्नीला आता या मोठ्या रकमेची मागणी करता येणार नाही.
करिअर संपवण्याची धमकी दिली
न्यायालयाने असंही नमूद केलंय की, धवन यांची एक्स पत्नी या कायदेशीर प्रक्रियेत कोर्टासमोर हजर राहिली नाही, त्यामुळे हा खटला एकतर्फी चालवण्यात आला. ऑस्ट्रेलियात दोन मालमत्तांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम पत्नीला देण्याचे आदेश धवन यांनी कधीही मान्य केले नव्हते. शिखर धवन यांनी कोर्टाला सांगितलं की, त्यांच्या पत्नीने त्यांची बदनामी करण्याची आणि करिअर संपवण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले होते.
