दोन्ही सलामीवीरांचं कौतुक
चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर श्रेयसने आपल्या खेळाडूंचे कौतुक करतानाच ड्रेसिंग रूममधील वातावरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. मैदानात उतरण्यापूर्वी दडपण होतं, पण ज्या पद्धतीने सुरुवात झाली ते पाहून आत्मविश्वास वाढल्याचं श्रेयसने यावेळी म्हटलं. श्रेयसने यावेळी दोन्ही सलामीवीरांचं कौतुक केलं. प्रियांशने 11 बॉलमध्ये केलेल्या 39 रन्सच्या वादळी खेळीमुळे 209 रन्सच्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करणं सोपं झालं. या दमदार सुरुवातीमुळे मधल्या फळीतील बॅटर्सवरचा दबाव कमी झाला आणि मॅचचा रिदम सेट झाला, असंही अय्यर म्हणाला.
advertisement
एका बॉलरला विजयाचं क्रेडिट
आम्ही बाहेरच्या लोकांसाठी नाही तर एकमेकांना प्रभावित करण्यासाठी क्रिकेट खेळण्याचं ठरवलं आहे. टीममध्ये एकमेकांना चॅलेंज दिल्याने खेळाडूंमध्ये स्पष्टता येतीय. तसेच, सुरुवातीच्या दोन्ही मॅचमध्ये जवळपास सर्वच बॅटर्सना बॅटिंगची संधी मिळाली आहे, ज्यामुळे कठीण परिस्थितीत प्रेशर कसं हाताळायचं याचा आत्मविश्वास टीमला मिळाल्याचं अय्यर म्हणाला. यावेळी त्याने एका बॉलरला विजयाचं क्रेडिट देऊन टाकलं.
चहलमुळेनिर्णय घेणं सोपं जातं - अय्यर
जेव्हा कधी मी संभ्रमात असतो, तेव्हा मी चहलकडे जातो, असं श्रेयस अय्यर म्हणाला. चहल हा आयपीएलमधील सर्वोत्तम बॉलर्सपैकी एक असून शिवम दुबेसारख्या स्पिनर्सना चांगले खेळणाऱ्या खेळाडूंसमोर देखील त्याने आपली भूमिका चोख बजावली आहे. अनुभवी चहलमुळे कॅप्टनला मैदानात निर्णय घेणं सोपं जातं आहे, असं म्हणत त्याने चहलला विजयाचं श्रेय दिलं. तसेच श्रेयसने स्लो ओव्हर-रेटबाबत चिंता व्यक्त केली आहे.
