जर निवडकर्ते दुर्लक्ष करणार असतील तर...
शुभमन गिलने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप संघनिवडीपूर्वी निवडकर्त्यांना एक प्रकारे आठवण करून दिली होती. 2023 च्या आयपीएलमध्ये त्याने 890 धावा केल्या होत्या आणि जर निवडकर्ते याकडे दुर्लक्ष करणार असतील, तर त्यांना शुभेच्छा, असे शुभमन गिल म्हणाला होता. त्यामुळे आता शुभमन गिलचं टी-ट्वेंटीमध्ये कमबॅक होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यावर वृत्त दिलं आहे.
advertisement
एकदिवसीय संघाचा उपकर्णधार
यावेळी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की गिल हा सध्या एकदिवसीय संघाचा उपकर्णधार आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर लगेचच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात त्याला टी-20 संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आले होते. शुभमन गिलला टी-20 विश्वचषकात संधी मिळाली नाही. त्यानंतर अक्षर पटेल याला व्हाईस कॅप्टन बनवण्यात आलं होतं. अशातच आता शुभमन गिलला संघात जागाच नाही तर व्हाईस कॅप्टन्सी देखील हवी आहे.
दोन जागा चार खेळाडू
एकीकडे शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत. तर दुसरीकडे अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी देखील आपली क्षमता दाखवून दिल्याने त्यांची जागा देखील फिक्स आहे. अशातच आता दोन सलामीवीरांच्या जागेसाठी चार पर्याय तयार झाले आहेत. त्यामुळे आता नेमकी संधी कुणाला मिळणार? असा सवाल विचारला जातोय. बीसीसीआयसमोर देखील मोठा पेच निर्माण झाला आहे.
बीसीसीआयसमोर पेच
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत. गिलची एक प्रमुख फलंदाज म्हणून झालेली प्रगती आणि इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाची प्रभावी कामगिरी, हे दोन्ही एकाच वेळी घडले आहे. तरीही, भारतीय टी-20 संघात केवळ टी-20 स्पेशलिस्ट खेळाडू असावेत की सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना संधी द्यावी, यावर अजूनही चर्चा सुरू आहे.