स्मृतीने इन्टाग्राम स्टोरीमध्ये काय लिहिलंय?
खेळ कधीच तुमच्या भावनेची कदर करत नाही. हे एक कटू सत्य आहे. पण ते करत नाही. तुम्ही थकला आहात की नाही याची त्याला पर्वा नाही. तुम्ही थकलेले असाल, नुकतेच जिंकला असाल, सर्वोत्तम खेळाडू असाल किंवा अगदी नवखे असला तरीही... खेळाला यापैकी कशाचीच फिकीर नसते. तुम्ही किती आत्मविश्वासात आहात किंवा किती नर्वस आहात, यानेही काही फरक पडत नाही, असं स्मृती मानधनाने इन्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे.
advertisement
Smriti Mandhana emotional instagram story
एक भयानक भावना...
खेळाला फक्त एकाच गोष्टीशी देणंघेणं असतं - ती म्हणजे तुम्ही मैदानात तो मॅच कसा खेळता. त्या दिवशी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तुम्ही कोणत्या जिद्दीने उतरता, हेच महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही खेळाला पूर्ण आदर देऊन तुमचे सर्वस्व अर्पण केले, तरच तुम्हाला यशाची संधी मिळू शकते. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा अनुभवण्याची मिळणारी संधी ही खरोखरच एक अप्रतिम भावना आहे. मला वाटतं ही एक भयानक भावना आहे, असं स्मृती मानधना म्हणाली.
स्मृतीचं मैदानावर कमबॅक
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून स्मृती मानधना वेदनेतून जात आहे. पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्यानंतर स्मृतीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर ती काही काळ अलिप्त राहिली होती. मात्र, ती हरली नाही. तिने पुन्हा मैदानात पाऊल ठेवलं अन् क्रिकेटचा सराव सुरू केला. काहीच दिवसात स्मृतीने वुमेन्स प्रिमियर लीगची ट्रॉफी देखील उंचावली. आता ती पुन्हा आपल्या रुळावर लागली आहे. त्यामुळे स्मृतीचे फॅन्स नक्कीच तिच्यासाठी आनंदी असतील.
