TRENDING:

Vaibhav Suryavanshi : 'वैभव सूर्यवंशीला आताच्या आता अटक करा', 14 वर्षाच्या खेळाडूविरुद्ध क्रिकेट बोर्डाने केली मागणी; कारणही सांगितलं!

Last Updated:

Vaibhav Sooryavanshi Arrest : आईसलँड क्रिकेट बोर्डाने ट्विट करत खळबळ उडवली आहे. त्यांनी वैभव सूर्यवंशीच्या अटकेची मागणी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vaibhav Suryavanshi : टीम इंडियाचा युवा आणि प्रतिभाशाली खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी याने हरारेच्या मैदानावर 175 धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. त्याच्या या अफलातून आयकॉनिक इनिंगमुळे टीम इंडियाला फायनलमध्ये सहज विजय (IND Vs ENG U19 Cricket World Cup Final) मिळवता आला. अशातच टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या या 14 वर्षाच्या (vaibhav suryavanshi real age) खेळाडूविरुद्ध एका क्रिकेट बोर्डाने अटक करण्याची मागणी केली आहे.
Someone arrest Vaibhav Sooryavanshi right now Iceland Cricket
Someone arrest Vaibhav Sooryavanshi right now Iceland Cricket
advertisement

वैभव सूर्यवंशीच्या अटकेची मागणी

विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशीने आपल्या इनिंगमध्ये 15 फोर आणि 15 सिक्स लगावले, ज्यामुळे केवळ बाउंड्रीच्या मदतीने त्याने 150 रन्स पूर्ण केले. वैभवच्या या झंझावाती कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 411 धावांचा डोंगर उभा केला होता. अशातच आता आईसलँड क्रिकेट बोर्डाने ट्विट करत खळबळ उडवली आहे. त्यांनी वैभव सूर्यवंशीच्या अटकेची मागणी केली आहे.

advertisement

पुणेरी टोमण्यात वैभवचं कौतुक

खरं तर आईसलँड क्रिकेट आपल्या मजेशीर ट्विटसाठी ओळखलं जातं. वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीनंतर देखील आईसलँडने ट्विट करत सर्वांना चकित केलं. वैभव सूर्यवंशीला आताच्या आता अटक करा. इंग्लिश गोलंदाजांविरुद्ध मैदानावर चाललेला हा हिंसाचार अत्यंत धोकादायक आहे, असं म्हणत पुणेरी टोमण्यात आईसलँड क्रिकेटने वैभवचं कौतूक केलं आहे. त्यावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स देखील केल्या आहेत.

advertisement

अटक केली जाऊ शकत नाही

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, वैभव सूर्यवंशी हा 16 वर्षांखालील एक लहान मुलगा आहे, त्यामुळे कायद्यानुसार त्याला अटक केली जाऊ शकत नाही. जर त्याच्या फलंदाजीच्या धडाक्यामुळे तुम्हाला इतका त्रास होत असेल, तर आम्ही त्याला यापुढे 19 वर्षांखालील कोणतेही सामने खेळण्यापासून रोखू शकतो, कारण आम्हाला कोणत्याही उदयोन्मुख क्रिकेटपटूचे करिअर खराब करायचं नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता, आता तुम्ही त्याला फक्त वरिष्ठ स्तरावरच खेळताना पाहाल, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 'वैभव सूर्यवंशीला आताच्या आता अटक करा', 14 वर्षाच्या खेळाडूविरुद्ध क्रिकेट बोर्डाने केली मागणी; कारणही सांगितलं!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल