लखनऊ सूपर जाएटसच्या मोहम्मद शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक शर्मासाठी ट्रॅप रचत त्याची विकेट काढली.त्याच्यानंतर शमीने त्याच्या दुसऱ्याच ओव्हरला ट्रेविसह हेडला माघारी धाडलं होतं. शमीनंतर प्रिन्स यादवच्या भेदक गोलंदाजीसमोर ईशान किशनचा काहीच निभाव लागलाी नाही तो क्लिन बोल्ड झाला. झटपट तीन विकेट पडल्यानंतर लियाम लिग्विस्टन आणि हेन्री क्लासेन ही जोडी मैदानात होती. पण ही जोडी पार्टनरशीप करत असताना दिग्वेश राठीने ही जोडी फोडली. राठीने लिविंगस्टनला 14 वर बाद केले.
advertisement
लिविंगस्टन बाद झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डी मैदानात आला होता.त्यामुळे रेड्डी आणि लिविंगस्टन जोडी मैदानात होती. हे दोघे मैदानात असताना सनरायझर्स हैदराबादचे 10 ओव्हरमध्ये फक्त 34 धावा होत्या.त्यामुळे काही करून या दोघांना धावा काढणे आवश्यक होते. त्यानुसार दोघांनी 63 बॉलमध्ये 116 धावांची पार्टनरशीप केली होती. यात नितिश रेड्डीने 33 बॉलमध्ये 56 धावा तर हेन्री क्लासेनने 41 बॉलमध्ये 62 धावा केल्या होत्या. या खेळीच्या बळावरच सनरायझर्स हैदराबाद 144 धावापर्यंत पोहोचली होती.
ज्यावेळेस हे दोन खेळाडू बाद झाले त्यानंतर जवळ जवळ हैदराबादसमोर दोन ओव्हर बाकी होत्या. या ओव्हरमध्ये 165 पर्यंत पोहोचता आलं असतं. पण हैदराबादने विकेट गमावली आणि 156 धावा केल्या होत्या.
