TRENDING:

IND vs PAK सामन्यामध्ये राडा होणार, तारिकचा काटा कसा काढायचा? अश्विनने सांगितलं!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. सुरूवातीला हा सामना होणार का नाही? यावरून मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलंबो : टी-20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. सुरूवातीला हा सामना होणार का नाही? यावरून मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्काराची घोषणा केली होती, पण आयसीसीच्या दबावानंतर पाकिस्तानने यूटर्न घेतला, त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.
IND vs PAK सामन्यामध्ये राडा होणार, तारिकचा काटा कसा काढायचा? अश्विनने सांगितलं!
IND vs PAK सामन्यामध्ये राडा होणार, तारिकचा काटा कसा काढायचा? अश्विनने सांगितलं!
advertisement

भारत-पाकिस्तानच्या या सामन्यात पाकिस्तानचा स्पिनर उस्मान तारीक टीम इंडियासाठी अडचण निर्माण करू शकतो, असं मत अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी मांडलं आहे. कोलंबोची स्पिन बॉलिंगला मदत करणारी खेळपट्टी आणि उस्मान तारीक याची बॉलिंग ऍक्शन या दुहेरी आव्हानाचा टीम इंडियाला सामना करावा लागणार आहे. उस्मान तारीक हा पाकिस्तानकडून आतापर्यंत फक्त 4 सामने खेळला आहे, पण तो टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरसाठी धोका ठरू शकतो.

advertisement

उस्मान तारिकची बॉलिंग ऍक्शन ही वेगळी आहे. बॉलिंग टाकताना त्याचा खांदा हा खालून येतो. तसंच तो बॉल टाकताना मध्येच थांबतो आणि मग बॉल टाकतो, ज्यामुळे बॅटरच्या मनातही संभ्रम निर्माण होतो. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन यानेही उस्मान तारीकच्या बॉलिंग ऍक्शनवर आक्षेप घेतला होता. टी-20 वर्ल्ड कपआधी झालेल्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सामन्यात ग्रीन उस्मान तारिकच्या बॉलिंग ऍक्शनवर नाराज होता.

advertisement

पीएसएलमध्येही उस्मान तारिकच्या बॉलिंग ऍक्शनवर दोनदा तक्रार करण्यात आली, पण आयसीसीने त्याला बॉलिंग करायला परवानगी दिली.

अश्विनने सांगितली भन्नाट आयडिया

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आर.अश्विन याने उस्मान तारिकला सापळण्यात अडकवण्याची भन्नाट आयडिया सांगितली आहे. उस्मान तारिकचं मानसिक खच्चीकरण करायचं असेल, तर तो बॉल टाकताना थांबला तर भारतीय खेळाडूनेही बाजूला व्हायला पाहिजे. आता कोणता भारतीय खेळाडू ही हिंमत करणार? ते मला पाहायचं आहे, असं अश्विन म्हणाला आहे. 'ऍश की बात' या युट्युब चॅनलवर अश्विन बोलत होता.

advertisement

'जर तारिक बॉल टाकण्याआधी थांबला तर बॅटरलाही स्टम्प पासून बाजूला व्हायचा अधिकार आहे. बॉल कधी येईल हे मला माहिती नाही, त्यामुळे मी दूर गेलो, असं बॅटर सांगू शकतो. यामुळे तारिकची लय बिघडू शकते, तसंच अंपायरही अडचणीत येतील, या परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं? ही अंपायरसाठी डोकेदुखी असेल. बॅटरला वॉर्निंग द्यायची का बॉलरला? हे अंपायरला ठरवावं लागेल. क्रिकेटमध्ये बहुतेकवेळा बॉलरलाच वॉर्निंग दिली जाते', असं अश्विनने सांगितलं.

'बॅटर माघार घेऊ लागला, तर तारिकवर किती दबाव येईल, याची कल्पना करा. त्याला मॅच सुरू असतानाच ऍक्शन बदलावी लागेल आणि पाकिस्तानचं ट्रम्प कार्ड चालणार नाही. तारिक हा त्यांचा प्रमुख बॉलर आहे, त्याला 24 बॉल टाकायचे आहेत', असं अश्विन म्हणाला आहे.

उस्मानच्या बॉलिंग ऍक्शनचा वाद

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
50 घरं, पोलिसांची फौज आणि रात्र! बुधवार पेठेच्या दलदलीत 'त्या' रात्री काय घडलं?
सर्व पहा

तारिक त्याच्या बॉलिंग अॅक्शनमुळे चर्चेत आला आहे. वैद्यकीय स्थितीमुळे आपण सरळ हाताने बॉलिंग करू शकत नाही, असं उस्मान तारिक युट्युबवर एक व्हिडिओ पोस्ट करून म्हणाला होता.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK सामन्यामध्ये राडा होणार, तारिकचा काटा कसा काढायचा? अश्विनने सांगितलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल