शॉट लागत नसल्यामुळे अखेर अभिषेक शर्माने वैतागून मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मार्को यानसनच्या बॉलिंगवर अभिषेक शर्माने लेग साईडच्या दिशेने हवेत बॉल मारला, यानंतर कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज कॅच पकडण्यासाठी धावले. बॉल पकडताना बॉश आणि महाराज यांच्यात टक्करही झाली आणि महाराज बॉशच्या अंगावर जाऊन पडला, पण तरीही बॉशने हातातून बॉल सोडला नाही.
advertisement
अभिषेक शर्मा 12 बॉलमध्ये 2 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने 15 रन करून आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 188 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात अत्यंत खराब झाली. इशान किशन शून्य रनवर आऊट झाला, तर तिलक वर्मा 1 रनवर माघारी परतला. 51 रनवरच अर्धी भारतीय टीम पॅव्हेलियनमध्ये परतली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 187 रनचा डोंगर उभा केला. 20 रनवरच दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या 3 विकेट पडल्या होत्या, पण त्यानंतर डेविड मिलर आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यात 50 बॉलमध्ये 97 रनची पार्टनरशीप झाली. मिलरने 35 बॉल 63 आणि ब्रेविसने 29 बॉल 45 रन केले, तर ट्रिस्टन स्टब्सने 24 बॉलमध्ये नाबाद 44 रनची खेळी केली. भारताकडून बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर अर्शदीपला 2 विकेट मिळाल्या. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबेला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
