शिवम दुबेने 37 बॉलमध्ये सर्वाधिक 42 रनची खेळी केली, तर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 18-18 रन केले. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यानसनला सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या, तर केशव महाराजने 3, कॉर्बिन बॉशने 2 आणि एडन मार्करमने 1 विकेट घेतली.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 187 रन केले. डेव्हिड मिलरने 35 बॉलमध्ये 63, डेवाल्ड ब्रेविसने 29 बॉल 45 आणि ट्रिस्टन स्टब्सने 24 बॉलमध्ये नाबाद 44 रन केले. भारताकडून बुमराहने 3, अर्शदीप सिंगने 2, वरुण चक्रवर्तीने 1 आणि शिवम दुबेने 1 विकेट घेतली.
advertisement
सूर्याने केली मोठी चूक
20 रनवरच दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या 3 विकेट गमावल्या होत्या, पण त्यानंतर मिलर आणि ब्रेविस यांच्यात 50 बॉलमध्ये 97 रनची पार्टनरशीप झाली. डेवाल्ड ब्रेविस याला शॉर्ट बॉलसमोर अडचणींचा सामना करावा लागतो, हे रेकॉर्ड माहिती असूनही त्याला भारतीय बॉलर्सनी गुड लेन्थ आणि फुल लेन्थवर बॉलिंग केली, ज्याचा फायदा त्याने उचलला. अखेर शिवम दुबेने शॉर्ट पिच बॉलवरच ब्रेविसची विकेट घेतली, पण तोपर्यंत उशीर झाला होता.
बॉलिंग क्रम चुकला
पहिल्या 20 ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवचा बॉलिंगचा क्रमही चुकला. 19 व्या ओव्हरपर्यंत भारताचे डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असलेले जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या 4-4 ओव्हर संपल्या होत्या, त्यामुळे सूर्याला शेवटची ओव्हर हार्दिक पांड्याला द्यावी लागली. हार्दिक पांड्याच्या या ओव्हरला ट्रिस्टन स्टब्सने 2 सिक्स आणि एका फोरच्या मदतीने 20 रन काढल्या.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीतला नंबर वन बॉलर वरुण चक्रवर्ती याच्यावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या बॉलपासूनच आक्रमण करायला सुरूवात केली. वरुणच्या 4 ओव्हरमध्ये आफ्रिकेने 47 रन काढल्या, तर हार्दिक पांड्याच्या 4 ओव्हरमध्ये 45 आणि शिवम दुबेच्या 2 ओव्हरमध्ये 32 रन आल्या.
