TRENDING:

T20 World Cup : 'सगळं झाकून ठेवू शकत नाही...', पहिल्या विजयानंतरही कॅप्टन सूर्या कुणावर भडकला?

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यात टीम इंडियाने युएसएवर 29 रननी विजय मिळवला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्या सामन्यात टीम इंडियाने युएसएवर 29 रननी विजय मिळवला आहे. भारताने दिलेलं 162 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या युएसएला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 132 रनच करता आल्या. पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाची अवस्था 77/6 अशी झाली होती, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने एकहाती किल्ला लढवला. सूर्याने 49 बॉलमध्ये 84 रनची नाबाद खेळी, ज्यात 10 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.
'सगळं झाकून ठेवू शकत नाही...', पहिल्या विजयानंतरही कॅप्टन सूर्या कुणावर भडकला?
'सगळं झाकून ठेवू शकत नाही...', पहिल्या विजयानंतरही कॅप्टन सूर्या कुणावर भडकला?
advertisement

कॅप्टन सूर्या कुणावर भडकला?

'आमची स्थिती 77/6 अशी होती. तिथे आम्ही किती दबावात होतो, हे फक्त मीच सांगू शकतो. मी इथे आझाद मैदान, क्रॉस मैदानात खूप क्रिकेट खेळलो आहे. ही खेळपट्टी मुंबईच्या तुलनेने वेगळी होती. सकाळी सूर्य प्रकाश नव्हता, त्यामुळे मी क्युरेटरला दोष देणार नाही. पण त्याचवेळी आम्ही सगळं काही झाकून ठेवू शकत नाही, आम्ही चांगली बॅटिंग करू शकलो असतो. आम्ही आरामात बसू, आमच्याकडे 5 दिवस आहेत', असं सूर्या म्हणाला आहे. तसंच वॉशिंग्टन सुंदर दिल्लीमध्ये टीमसोबत येईल, बुमराहला ताप आला होता म्हणून तो खेळू शकला नाही, असं सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं आहे.

advertisement

'मागच्या वर्षीही मी अशाप्रकारे बॅटिंग करण्याचा प्रयत्न करत होतो, पण यश येत नव्हतं. मला निश्चितपणे माहिती होतं, की एक दिवस ते येईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्षातली शेवटची सीरिज खेळल्यानंतर मी सोडून दिलं. किट बॅग पॅक केली आणि दोन आठवडे कुटुंबासोबत घालवले. नवीन वर्षाच्या सुरूवातीला नागपूरला गेलो, तेव्हा सगळं बदललं होतं', अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

'शेवटपर्यंत बॅटिंग करण्यासाठी एका बॅटरची गरज आहे, हे मला वाटत होतं. मला ही खेळपट्टी कधीच 180-190 रनची वाटली नाही. 140 रन बरेच होतील, असं मला वाटलं होतं. गौतम गंभीरने 14 ओव्हरच्या ब्रेकवेळी शेवटपर्यंत टिकून राहा, असं सांगितलं होतं. मला या विकेटवर कसं खेळायचं माहिती आहे. मी माझे शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होतो', असं सूर्यकुमार यादवने सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 'सगळं झाकून ठेवू शकत नाही...', पहिल्या विजयानंतरही कॅप्टन सूर्या कुणावर भडकला?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल