TRENDING:

T20 World Cup : सुपर 8 च्या 'ग्रुप ऑफ डेथ'वरून राडा! सूर्या ICC च्या नियमावर नाराज पण गावस्करांनी काढली आरोपांची 'विकेट'

Last Updated:

Sunil Gavaskar On Super 8 pre seeding rule : हे प्रश्न आताच का उपस्थित केले जात आहेत? जेव्हा टूर्नामेंट सुरू झाली, तेव्हा कोणीही का बोलले नाही?" असा थेट सवाल त्यांनी टीकाकारांना विचारला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
T20 World Cup Super 8 Pre Seeding rules : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 'सुपर-8' चे गट जाहीर होताच सोशल मीडियावर एका आयसीसीच्या नियमामुळे वादाला तोंड फुटलं आहे. आयसीसीच्या 'प्री-सीडिंग' नियमामुळे अनेक क्रिकेट प्रेमी आणि तज्ज्ञ नाराज असताना, भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मात्र या नियमाचा जोरदार बचाव केलाय. त्यांनी टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले असून आयसीसीच्या निर्णयामागील तांत्रिक बाजू स्पष्ट केली आहे. यावर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने नाराजी व्यक्त केली होती.
sunil Gavaskar defends icc super 8 pre seeding rules
sunil Gavaskar defends icc super 8 pre seeding rules
advertisement

आयसीसीचा 'प्री-सीडिंग' नियम

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आयसीसीने 'प्री-सीडिंग' हा वेगळा नियम लागू केला होता. या नियमामुळे ग्रुप स्टेजमध्ये आपल्या सर्व मॅचेस जिंकून टॉपवर राहणारे चार बलाढ्य संघ (भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका) एकाच गटात आले आहेत. यामुळे या ग्रुपला 'ग्रुप ऑफ डेथ' असं म्हटले जात असून, सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टीम्सनाच आता एकमेकांविरुद्ध खेळून स्पर्धेतून बाहेर व्हावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

advertisement

आयसीसीवर पक्षपाताचा आरोप

दुसरीकडे, ज्या टीम्स दुसऱ्या क्रमांकावर होत्या, त्यांना तुलनेने सोप्या गटात स्थान मिळाले आहे. या विसंगतीमुळे चाहत्यांनी आयसीसीवर पक्षपाताचा आरोप केला आहे. मात्र, सुनील गावस्कर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत यावर संताप व्यक्त केला. "हे प्रश्न आताच का उपस्थित केले जात आहेत? जेव्हा टूर्नामेंट सुरू झाली, तेव्हा कोणीही का बोलले नाही?" असा थेट सवाल त्यांनी टीकाकारांना विचारला आहे.

advertisement

लॉजिस्टिक अडचणींवर प्रकाश

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

गावस्कर यांनी या नियमामागील लॉजिस्टिक अडचणींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, इंटरनॅशनल ट्रॅव्हल, इमिग्रेशन आणि कस्टम्स यांसारख्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आगाऊ नियोजनाची गरज असते. प्रत्येक टीमसोबत 15 लोकांचा सपोर्ट स्टाफ आणि खेळाडू मिळून 35 ते 40 जणांचा ताफा असतो. त्यांच्यासाठी एअरलाइन तिकीट आणि हॉटेल बुकिंगचे व्यवस्थापन करणे सोपे नसते, त्यामुळेच आयसीसीने प्री-सीडिंगचा आधार घेतला असावा, असं गावस्कर म्हणाले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : सुपर 8 च्या 'ग्रुप ऑफ डेथ'वरून राडा! सूर्या ICC च्या नियमावर नाराज पण गावस्करांनी काढली आरोपांची 'विकेट'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल