TRENDING:

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वस्त्रहरण, कॅप्टन सूर्या संतापला, खापर कुणावर फोडलं?

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2022 च्या सेमी फायनलनंतर पहिल्यांदाच टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवने टीम इंडियाच्या खेळाडूंचे कान टोचले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदाबाद : टी-20 वर्ल्ड कपमध्ये 2022 च्या सेमी फायनलनंतर पहिल्यांदाच टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला आहे. 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 च्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 रननी पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 188 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 18.5 ओव्हरमध्ये 111 रनवर ऑलआऊट झाला. फक्त बॅटिंगच नाही तर बॉलिंगमध्येही टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वस्त्रहरण, कॅप्टन सूर्या संतापला, खापर कुणावर फोडलं?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वस्त्रहरण, कॅप्टन सूर्या संतापला, खापर कुणावर फोडलं?
advertisement

काय म्हणाला कॅप्टन सूर्या?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने भारतीय खेळाडूंचे कान टोचले आहेत. 'सुरूवातीला आम्ही मॅचमध्ये होतो. सुरूवातीला आम्ही चांगली बॉलिंग केली. 21 रनवर त्यांच्या 3 विकेट गेल्या होत्या. 7 ते 15 ओव्हरमध्ये त्यांनी उत्कृष्ट बॅटिंग केली, त्यानंतर आम्ही पुन्हा पुनरागमन केलं, पण आम्ही चांगली बॅटिंग करू शकलो असतो', असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.

advertisement

बॅटिंगवर फोडलं खापर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुण्यात 'हे' पहिल्यांदाच घडतंय, Video
सर्व पहा

'कधी कधी तुम्ही विचार केला पाहिजे, 180-185 रनचा पाठलाग करताना तुम्ही पॉवर प्ले मध्ये मॅच जिंकू शकत नाही, पण तुम्ही पॉवर प्ले मध्ये सामना हरू शकता. पॉवर प्लेमध्ये आम्ही बऱ्याच विकेट गमावल्या. त्यानंतर आम्ही छोट्या छोट्या पार्टनरशीपही करू शकलो नाही. 180-185 रनचा पाठलाग करताना छोट्या छोट्या पार्टनरशीपची गरज असते, पण हा खेळाचा भाग आहे. आम्ही यातून शिकू आणि जोरदार कमबॅक करू. झिम्बाब्वेविरुद्ध आम्ही बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग चांगली करू. आम्ही गोष्टी सोप्या ठेवू आणि त्याच ब्रँडचं क्रिकेट खेळू', अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वस्त्रहरण, कॅप्टन सूर्या संतापला, खापर कुणावर फोडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल