कोणत्या खेळाडूंनी दिली गंभीरची ब्रोन्को टेस्ट?
टीम इंडियाच्या खेळाडूंनी शनिवारी दुबईमध्ये दुसऱ्या सराव सत्रादरम्यान ब्रोन्को चाचणी दिली. जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, रिंकू सिंग, अर्शदीप सिंग आणि इतर खेळाडू नवीन फिटनेस चाचणीत भाग घेताना दिसले, अशी माहिती रेव्हस्पोर्ट्झच्या हवाल्याने समोर आली आहे.
फिटनेस मूल्यांकन
ब्रोन्को टेस्ट ही निवड प्रक्रियेचा भाग नाही तर ती फिटनेस मूल्यांकन देखील आहे आणि भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी बेकेनहॅम येथे झालेल्या तयारी शिबिरादरम्यान भारतीय संघातील काही सदस्यांनी ही चाचणी घेतली होती, अशी माहिती देखील रिपोर्टमधून समोर आली आहे.
advertisement
Bronco Test आहे काय?
दरम्यान, Bronco Test ही एक उच्च-तीव्रतेची फिटनेस चाचणी आहे, जी खेळाडूंची ॲरोबिक सहनशक्ती, वेग आणि स्टॅमिना मोजते. ही एक सतत चालणारी धावण्याची ड्रिल आहे, जी अनेक वर्षांपासून रग्बीसारख्या खेळांमध्ये वापरली जाते. ही चाचणी सोपी असली तरी खूपच कठीण आहे. यात खेळाडूला कोणत्याही विश्रांतीशिवाय सलग पाच शटल रन पूर्ण कराव्या लागतात. प्रत्येक सेटमध्ये, खेळाडूला वेगवेगळ्या अंतरावर असलेल्या तीन खुणांपर्यंत धावून परत यावे लागते.