शाळेच्या मुख्याध्यापकांनी बजावलं...
गेल्या काही दिवसांपासून वैभव सूर्यवंशीचं हॉल तिकीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वैभवच्या पेपर सेंटरची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. तर वैभवला स्पेशल वागणूक दिली जाणार नाही, असंही शाळेच्या मुख्याध्यापकांनी बजावलं होतं. अशातच आता वैभव यंदाच्या वर्षी 10 चा पेपर देणार नसल्याचं त्याच्या वडिलांनी म्हटलं आहे. बिहारमधील ताजपूरचा रहिवासी असलेला वैभव सुर्यवंशी सध्या ट्रेनिंग, सराव शिबिरे आणि विविध क्रिकेट टूर्नामेंट्समध्ये प्रचंड व्यस्त असल्यानं वैभवने हा कठीण निर्णय घेतल्याचं समजतंय.
advertisement
परीक्षा केंद्र निश्चित
वैभव सूर्यवंशी ताजपूरमधील मॉडेस्टी स्कूलचा विद्यार्थी असून 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी त्याचे फॉर्म भरले गेले होते. अगदी त्याचे ॲडमिट कार्ड देखील प्रसिद्ध झाले होते आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याचे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. मात्र, सततच्या क्रिकेट मॅचेस आणि प्रवासामुळे त्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे यावर्षीची बोर्ड परीक्षा न देण्याचा निर्णय वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी आणि शाळा प्रशासनाने चर्चेनंतर घेतला आहे.
वैभव सूर्यवंशीची कामगिरी
दरम्यान, अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ मध्ये टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात वैभवचा मोलाचा वाटा होता. या स्पर्धेत त्याने ७ मॅचेसमध्ये ६२.७१ च्या सरासरीने ४३९ रन्स कुटले होते, ज्यामध्ये इंग्लंडविरुद्ध फायनलमध्ये त्याने ठोकलेल्या १७५ रन्सचाही समावेश आहे. त्याच्या या तुफानी कामगिरीमुळे आणि १६९.४९ च्या स्ट्राईक रेटमुळे तो स्पर्धेत सर्वाधिक रन्स बनवणारा दुसरा खेळाडू ठरला. या छोट्या वयात त्याने क्रिकेटच्या पिचवर अनेक मोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
