अफगाणिस्तानविरुद्धच्या या विजयासोबतच भारताने आणखी एका अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडसोबत होणार आहे. याआधी इंग्लंडने पहिल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 27 रननी विजय मिळवला होता.
टीम इंडियाने आतापर्यंत 5 वेळा अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता. 2000 साली मोहम्मद कैफ, 2008 साली विराट कोहली, 2012 साली उनमुक्त चंद, 2018 साली पृथ्वी शॉ आणि 2022 साली यश धूलच्या नेतृत्वात भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. आता 2026 साली मुंबईच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात आणखी एक ट्रॉफी भारतात आणण्याची संधी टीम इंडियासमोर चालून आली आहे.
advertisement
कधी होणार फायनल?
भारत आणि इंग्लंड यांच्यातला अंडर-19 वर्ल्ड कपचा फायनल सामना हा शुक्रवार 6 फेब्रुवारीला झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता या मॅचला सुरूवात होणार आहे.
भारतीय टीम
आयुष म्हात्रे, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, दीपेश देवेंद्रन, मोहम्मद इनान, एरॉन जॉर्ज, अभिज्ञान कुंडू, किशन कुमार सिंग, विहान मल्होत्रा, उद्धव मोहन, हेनिल पटेल, खिलन पटेल, हरवंश पंगालिया, वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी
