युनायटेड अरब अमिरातच्या या विजयात 21 वर्षाच्या आर्यंश शर्माने मोलाची भूमिका बजावली आहे. कारण त्याने
53 बॉलमध्ये 73 धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. या खेळाडूच कनेक्शन भारताशी आहे.त्यामुळे आर्यंश शर्मा
कोण आहे? हे जाणून घेऊयात.
कॅनडाने युएईसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आर्यंश शर्माने 53 बॉलमध्ये 74 धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने 3 षटकार आणि सहा चौकार लगावले होते. या विजयात त्याला सोहेब खानने 51 धावांनी अर्धशतकीय खेळी करून चांगली साथ दिली होती. सोहेबने यावेळी 29 बॉलमध्ये 51 धावांची खेळी केली होती.या दोन्ही खेळाडूंच्या बळावर युएईने कॅनडाचा पाच विकेटने पराभव केला होता.
advertisement
या विजयात मोलाची भूमिका बजावणारा आर्यंश शर्मा हा भारतीय आहे.त्याचा जन्म 3 डिसेंबर 2004 रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे झाला. तो वयाच्या दोन वर्षांचा असताना त्याच्या कुटुंबासह युएईला गेला होता. दुबईमध्ये शिक्षण घेत असताना, त्याला क्रिकेटमध्ये रस निर्माण झाला आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने त्याने क्रिकेटमध्ये करिअर केले.
अर्यांशने पहिल्यांदा 2022 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात युएईचे प्रतिनिधित्व केले. 2024 च्या टी20 वर्ल्ड कपच्या पात्रता स्पर्धेतही तो संघाचा भाग होता. 2023 मध्ये त्याला नेपाळमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेसाठी युएईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाल्यानंतर त्याला मोठा ब्रेक मिळाला. या मालिकेमुळे युएईने क्रिकेट विश्वचषक पात्रता फेरीत प्रवेश मिळवला.
आर्यांशने 17 ऑगस्ट 2023 रोजी न्यूझीलंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात 43 चेंडूत 60 धावा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंत त्याने15 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 365 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
