TRENDING:

Vaibhav Sooryavanshi : 'मी सकाळी साडेचार वाजता झोपलो...', VVS लक्ष्मणचे एक वाक्य अन् वैभवने सहज ठोकले 175 रन्स, काय म्हणाला?

Last Updated:

Vaibhav Sooryavanshi advice from vvs laxman : मी सकाळी साडेचार वाजता झोपलो. माझ्या डोक्यात खूप काही गोष्टी सुरू होत्या. पण व्हिव्हिएस लक्ष्मण सरांसोबत माझं काल बोलणं झालं, असं वैभव सूर्यवंशीने सांगितलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
IND Vs ENG U19 Cricket World Cup Final : आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना 6 फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेच्या हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवून दणक्यात अंडर 19 वर्ल्ड कपवर नाव कोरलं. टीम इंडियाकडून सर्वात महत्त्वाची खेळी केली ती 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशी याने... इंग्लंडच्या बॉलर्सला आस्मान दाखवत वैभव सूर्यवंशीने 175 धावांनी आयकॉनिक इनिंग खेळली. अशातच वैभव सूर्यवंशीला एका खास व्यक्तीचं वाक्य मनाला भावलं. त्याचा खुलासा त्याने फायनल जिंकल्यानंतर केला.
Vaibhav Sooryavanshi, vvs laxman, IND Vs ENG
Vaibhav Sooryavanshi, vvs laxman, IND Vs ENG
advertisement

मी सकाळी साडेचार वाजता झोपलो... - वैभव सूर्यवंशी

मी सकाळी साडेचार वाजता झोपलो. माझ्या डोक्यात खूप काही गोष्टी सुरू होत्या. पण व्हिव्हिएस लक्ष्मण सरांसोबत माझं काल बोलणं झालं. त्यांनी मला म्हटलं होतं की, तू सेंच्युरीच्या मागे पळू नकोस. तू फक्त तुमच्या ताकदीवर भर दे, स्वत:हून शतक तुझ्या झोळीत पडेल. देवाच्या आशीर्वादाने आम्ही चांगली कामगिरी केली, असं वैभव सूर्यवंशी म्हणाला.

advertisement

अंडर 19 चा एकट वर्ल्ड कप

भारतात तुम्ही फक्त एकच अंडर 19 वर्ल्ड कप खेळू शकता. त्यामुळे हा वर्ल्ड कप माझ्यासाठी आठवणीत राहण्यासारखा होता. सिनियर खेळाडू झालात तर जास्त वर्ल्ड कप खेळू शकता पण अंडर 19 चा एकट वर्ल्ड कप खेळता येतो. त्यामुळे ही आठवण आयुष्यभर माझ्या आठवणीत राहिल, असं वैभव सूर्यवंशी म्हणालाय.

advertisement

15 सिक्सच्या मदतीने 175 धावांची खेळी

दरम्यान, अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. वैभवने 80 बॉलमध्ये 15 फोर आणि 15 सिक्सच्या मदतीने 175 धावांची खेळी केली. फायनलमध्ये 150 च्या वर स्कोर करणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. वैभव सूर्यवंशीने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 1412 रन्स केल्या आहेत, त्याने विजय झोलचा रेकॉर्ड मोडून काढलाय. अशातच आता वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाच्या मेन्स टीममध्ये संधी मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन -आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कॅप्टन), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Sooryavanshi : 'मी सकाळी साडेचार वाजता झोपलो...', VVS लक्ष्मणचे एक वाक्य अन् वैभवने सहज ठोकले 175 रन्स, काय म्हणाला?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल