टीम इंडियाचा कर्णधार आयुश म्हात्रे टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्ज मैदानात आले होते.दोघेही डावाची चांगली सूरूवात करतील,अशी अपेक्षा होती.पण ऑरोन जॉर्न 9 वर बाद झाला.त्यानंतर कर्णधार आयुश म्हात्रे मैदानात आला होता.यावेळी दोघांनी टीचून फलंदाजी करत धावगती वाढवली होती.या दरम्यान वैभव सूर्यवंशी आणि आयुश म्हात्रेमध्ये 142 धावांची पार्टनरशीप झाली होता. त्यानंतर आयुश 53 धावा करून बाद झाला.
advertisement
आयुश बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने 55 बॉलमध्ये आपले शतक पूर्ण केले होते. या शतकानंतर वैभव थांबल नाही त्याने वादळी खेळी सूरूच ठेवली. अशाप्रकारे जवळपास त्याने 80 बॉलमध्ये 175 धावांचा दीड शतकीय खेळी केली होती.या खेळी दरम्यान त्याने 15 चौकार आणि 15 षटकार मारले होते.
वैभव ज्यावेळेस आऊट झाला त्यावेळेस 26 वी ओव्हर सूरू होती आणि भारताच्या धावा 250 च्या पार गेल्या होत्या. आता उरलेल्या 25 ओव्हरमध्ये टीम इंडिया हमखास 500 धावा करता आल्या असत्या. पण झालं असं की वैभव बाद झाल्यानंतर कोणत्याही खेळाडूने 25 ओव्हर टीकून खेळण्याचा विचार केला नाही, याउलट ते वेगाने खेळत बाद झाले. भारताच्या धावा जवळपास चांगल्या स्थितीत होत्या इथून पुढे जास्तीत जास्त खेळाडूंनी टीकून खेळले असते तरध धावा 500 पर्यंत गेल्या होत्या.
भारताचा रनरेटही चांगला होता पण खेळाडू मैदानात टीकत नव्हते, जसे वेदांत त्रिवेदी 32, विहान मल्होत्रा 30 वर बाद झाले. अभिग्यान कुंडूकडून मोठया धावांची अपेक्षा होती, पण तो 40 धावांवर बाद झाला. त्यानंतर असे वाटत होते भारताचा डाव हा 400च्या आतच ऑल आऊट होईल पण कनिश्क चौहान ताबडतोड 37 धावांची खेळी करून भारताला 400 च्या पार नेले होते.
