खरं तर कंटेट क्रिएटर मिस्टर नाग्सने विराट कोहलीची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत विराट कोहलीला एक प्रश्न विचारण्यात आला होता.खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून हाच प्रश्न चाहते सोशल मीडियावर विचारताय. त्यामुळे हाच प्रश्न मिस्टर नाग्सने विराट कोहलीला विचारला होता. खरं तर आयपीएलमध्ये एका टीममधून फक्त 4 ओव्हर्सीस प्लेअर खेळवण्याचा नियम आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 5 ओव्हर्सीस प्लेअर खेळवते ? असा सवाल कोहलीला विचारण्यात आला होता.
advertisement
विराट कोहलीने टेस्ट आणि टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो वनडे फॉरमॅटमध्ये खेळतो आहे. पण सध्या वनडे मालिका नसल्याने तो आपल्या लंडनच्या घरी राहतो.विराट सोबत त्याची बायको आणि त्याची मुलगी देखील तिथेच राहते. एकंदरीत विराट कोहली लंडनला राहतो म्हणून आरसीबी 5 ओव्हर्सीस खेळाडूंना मॅचमध्ये खेळवते, असा सवाल मिस्टर नाग्सने विचारला होता.
लोकं म्हणतायत आरसीबी 5 ओव्हर्सीस प्लेअर खेळवते, पण मला काय कळत नाही ते काय बोलतायत ते, मिस्टर नाग्स हे बोलताच पहिल्यांदा विराट कोहली जोरजोरानो हसतो. नंतर म्हणतो, मला कळत नाहीये तुम्ही मला हा प्रश्न का विचारत आहात? तुम्ही ओव्हर्सीस प्लेअर्सना विचारा ना? मी काय ओव्हर्सीस प्लेअर नाही आहे, असे बोलत तो मिस्टर नाग्सला विचारतो, मी ओव्हरसीस प्लेअर आहे का? यावर तो देखील नकार देतो.
गेल्या महिन्यात, कोहलीने आयपीएल २०२६ दरम्यान भारत आणि लंडन दरम्यान प्रवास करण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटची मागणी केल्याच्या खोट्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. या वृत्तानुसार, जेव्हा सामन्यांमध्ये तीन दिवसांपेक्षा जास्त अंतर असेल तेव्हा त्याला मायदेशी परतायचे होते. तथापि, आरसीबीच्या माजी कर्णधाराने, आता डिलीट केलेल्या त्या पोस्टचा स्क्रीनशॉट 'खूप हसण्याच्या' इमोजींसह आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत हे वृत्त फेटाळून लावले.
