रिंकू सिंहच्या वडिलांना चौथ्या स्टेजचा लिव्हर कॅन्सर
मिळालेल्या माहितीनुसार, रिंकू सिंह याच्या वडिलांना चौथ्या स्टेजचा लिव्हर कॅन्सर (Liver Cancer) असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांची प्रकृती खालावल्याची बातमी मिळताच रिंकू तातडीने सराव सोडून वडिलांकडे रवाना झाला असून तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिंकूच्या वडिलांची प्रकृती सध्या अतिशय नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
advertisement
चौथ्या स्टेजचा लिव्हर कॅन्सर किती घातक?
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, चौथ्या स्टेजचा लिव्हर कॅन्सर हा अत्यंत घातक आणि जीवघेणा प्रकार मानला जातो. कॅन्सर सर्जन डॉ. जयेश शर्मा यांनी सांगितलं की, या स्टेजला पोहोचलेल्या रुग्णांचा जगण्याचा दर केवळ 3 ते 5 टक्के इतकाच असतो. याचा अर्थ असा की, 100 पैकी फक्त 3 ते 5 रुग्णच उपचारानंतर 5 वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकतात, ज्यामुळे ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे रिंकु प्रकृतीची माहिती कळताच तो तातडीने घरी रवाना झाला.
आगामी मॅच खेळणार की नाही?
दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध रिंकू सिंह आगामी मॅच खेळणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तो 24 फेब्रुवारी रोजी घरच्यांच्या मदतीसाठी तातडीने निघून गेला होता. अशातच तो मॅचच्या दिवशी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये परत येऊ शकतो, अशी माहिती आहे. रिंकूसाठी बीसीसीआयने तातडीची जायची व्यवस्था केली असून तो लवकर ड्रेसिंग रुममध्ये कमबॅक करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
