माझ्यासारखी चूक करू नका - युवराज सिंग
मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीत गोल्फ खेळू शकला नाही. जर तो खेळला असता तर त्याच्या नावावर जास्त धावा झाल्या असत्या. जर मी गोल्फ खेळलो असतो तर कदाचित माझ्याकडे 3000 अधिक आंतरराष्ट्रीय धावा झाल्या असत्या. म्हणूनच मला वाटत नाही की माझ्यासारखी चूक इतर कोणीही करावी, असं युवराज सिंग म्हणाला.
advertisement
मानसिक शांतता पाहिजे असेल तर.. - युवराज सिंग
गोल्फ शरीरावर कमी भार टाकतो आणि मानसिक शांतता त्यामुळे कायम राहते. जर तुम्ही ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधील बहुतेक सर्वोत्तम खेळाडूंकडे पाहिले तर ते सर्व गोल्फ खेळतात. पण भारतात याचं प्रमाण कमी आहे, असं युवराज सिंग म्हणाला.
खेळाडूने गोल्फ खेळला पाहिजे - युवराज सिंग
बरेच खेळाडू कमी सराव करतात आणि दौऱ्यांदरम्यान जास्त गोल्फ खेळतात कारण तुमचा खेळ तीन दिवसांत बदलू शकत नाही. म्हणूनच केवळ क्रिकेट खेळाडूंनीच नाही तर जगातील कोणत्याही खेळाडूने गोल्फ खेळला पाहिजे कारण तो त्यांच्या खऱ्या खेळातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर काढतो, असं मत युवराज सिंगने नोंदवलं आहे.