पहिलं कारण म्हणेज पाण्याची लेव्हल चुकीची असल्याने असा आवाज येतो. कूलरमध्ये पाणी खुप कमी असेल तर पंप हवा ओढतो. यामुळे पाणी आणि हवेचं मिश्रण तयार होतं. जे पाईपमध्ये बुडबुडे तयार करतं आणि गडगड आवाज येतो. तसंच पाणी जास्त भरलं तरीही ओव्हरफ्लोमुळे पाणी पंपातून खाली येण्याचा आवाज येतो.
पंपात हवा जाणे
advertisement
कूलरचं पंप पाण्याला वरच्या ट्रेमध्ये घेऊन जातो. पंपात हवा गेली तर पाणी योग्य प्रकारे जात नाही. हवेचे बुडबुडे पाइपमध्ये फिरतात आणि गडगड आवाज येतो. कूलर दीर्घकाळापासून बंद पडलं असेल किंवा पाणी बदलताना पंपात हवा गेली तर असा आवाज येतो.
फूल स्पीड करुनही फॅन हवा देत नाहीये? फक्त 60 रुपयांत होईल काम, सुपरफास्ट फिरेल पंखा
पाइप आणि नोजरमध्ये घाण किंवा ब्लॉकेज
उन्हाळ्यात धूळ-माती किंवा पाण्यातील खनिज जमा होतात. यामुळे लहान-लहान छिद्र ब्लॉक होतात. पाणी जोरात या छिद्रांमध्ये जातं तेव्हा असामान्य प्रवाहामुळे गडगड आवाज येतो.
फॅनच्या वेगवान हवेचा परिणाम
कूलरचा फॅन वेगाने चालतो तेव्हा कधी-कधी हवा पाण्यावर दबाव टाकते. ज्यामुळे पाण्यात हालचाल होते आणि पाइपमध्ये बुडबुडे जमा होतात.
जुना किंवा खराब पंप
कूलर अनेक वर्षे जुना असेल तर पंप कमकुवत होतं. ते नीट पाणी ओढू शकत नाही आणि आवाज करते.
उन्हाळ्यात 90% टक्के लोक करतात फ्रीजची 'ही' चूक! तुम्हीही करत असाल तर सावधान, वाढू शकतं वीज बिल
हा प्रॉब्लम कसा दूर करावा?
- सर्वात आधी कूलरचं पाणी पूर्णपणे काढून घ्या आणि टँक स्वच्छ करा.
- स्वच्छ पाणी भरा आणि लेव्हल योग्य ठेवा. (सामान्यतः अर्ध्यापेक्षा जास्त भरू नका.)
- पंप चेक करा. तो खाली वर हलवून त्यातील हवा बाहेर काढा.
- नोजल आणि पाण्याचा पाइप स्वच्छ करा. ब्लॉक असेल तर सुई किंवा ब्रशने स्वच्छ करा.
- प्रत्येक 15-20 दिवसात पाणी बदलत राहा आणि कूलर झाकून ठेवा. जेणेकरुन धूळ आत जाणार नाही.
मॅकेनिकला कधी बोलवावं?
आपण वर पाहिलेले उपाय केल्यानंतरही आवाज थांबत नसेल, पंपातुन जळण्याचा आवाज किंवा पाणी अजिबात येत नसेल तर प्रोफेशनल सर्व्हिसमेनला बोलवू शकता. पंप किंवा मोटर खराब झालेली असू शकते.
कूलरमधून येणारा गडगड आवाज हा जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये गंभीर समस्या नसते. लहान-मोठ्या दुर्लक्षांमुळे हा प्रॉब्लम येत असतो. तुम्ही नियमित कूलर स्वच्छ केलं, पाणी योग्य लेव्हलवर ठेवलं आणि वेळोवेळी सर्व्हिसिंग करत राहिलात तर कूलर कोणताही आवाज न करता हवा देत राहील.
उन्हाळ्यात कूलरची योग्य काळजी घेतली तर कूलरमधून आवाजही येत नाही. यासोबत कूलरची लाइफही वाढते. पुढच्या वेळी कूलरमधून आवाज आल्यास घाबरू नका. वर सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करा.
