Smartphone चार्जिंगची हिडन सेटिंग 90% लोकांना माहितीच नाही, वाढवते फोनची लाइफ
SD कार्डवर व्हिडिओ कसा डाउनलोड करायचा?
YouTube वरून व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी, तुम्हाला व्हिडिओ पाहण्याच्या पेजवरील डाउनलोड बटण दाबावे लागेल. हे फीचर वापरण्यासाठी फोनमध्ये SD कार्ड असणे आवश्यक आहे. YouTube व्हिडिओ डाउनलोडसाठी SD कार्ड डिफॉल्ट स्टोरेज लोकेशन बनवण्यासाठी, काही सोप्या स्टेप्स फॉलो करणे आवश्यक आहे. यासाठी, सर्वप्रथम, यूट्यूबवरील तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करून सेटिंग्जमध्ये जा आणि नंतर Background and Downloads वर क्लिक करा. येथून यूज SD कार्ड ऑप्शन इनेबल करा.
advertisement
BSNL चा मोठा प्लॅन! लॉन्च करणार eSIM, पहा कधी होणार उपलब्ध
असे न केल्यास इंटरनल स्टोरेजवर स्टोअर होईल व्हिडिओ
SD कार्ड ऑप्शन इनेबल नसेल तर व्हिडिओ फोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये स्टोर केला जाईल. YouTube इंटरनल स्टोरेजमधून SD कार्डवर व्हिडिओ ट्रान्सफर करण्याची परवानगी देत नाही. परंतु हे करण्याचा एक मार्ग आहे. यासाठी सर्वात आधी तुम्हाला इंटरनल स्टोरेजमधील डाउनलोड केलेला व्हिडिओ डिलीट करावा लागेल. यानंतर, सेटिंग्जमध्ये जा आणि व्हिडिओ स्टोरेज लोकेशन चेंज करा आणि व्हिडिओ पुन्हा डाउनलोड करा. आता हा व्हिडिओ फोनच्या इंटरनल स्टोरेजऐवजी SD कार्डवर स्टोअर केला जाईल. डाउनलोड करताना, लक्षात ठेवा की, व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी SD कार्डमध्ये पुरेसे स्टोरेज असावे. असे न झाल्यास व्हिडिओ डाउनलोड करता येणार नाही.
