कोट्यवधी मोबाईल यूझर्ससाठी मोठी बातमी, या लोकांना मिळणार नाही सिम; यात तुम्ही आहात?
फक्त 9 सिम कार्ड जारी केले जाऊ शकतात
सिमकार्डसाठी, एका ओळखपत्रावर म्हणजे आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा इतर दस्तऐवजावर फक्त 9 सिम कार्ड जारी केले जाऊ शकतात. याशिवाय मोठ्या प्रमाणात सिम कार्ड जारी करण्यासाठी व्यावसायिक डॉक्यूमेंट असणे आवश्यक आहे. योग्य कागदपत्रांशिवाय मोठ्या प्रमाणात सिम कार्ड जारी केले जाऊ शकत नाहीत. असे केल्यास लाखो रुपयांचा दंड होऊ शकतो आणि बिझनेस एंटिटिला दोन वर्षांसाठी ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाऊ शकते.
advertisement
याशिवाय, कोणत्याही सिम कार्डवरील इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल्स थांबवल्यानंतर 90 दिवसांनंतरच ते पूर्णपणे बंद होईल. त्यानंतरच ते इतर यूझर्सला दिले जाईल. सिम कार्ड स्वॅप केल्यानंतर म्हणजेच बदलल्यानंतर 24 तास एसएमएस येणार नाहीत. अशा प्रकारची ओटीपी फसवणूक थांबवण्यासाठी ट्रायने पावले उचलली आहेत. सिम कार्ड जारी करणाऱ्या पॉइंट ऑफ सेल किंवा किरकोळ विक्रेत्याला टेलिकॉम ऑपरेटरकडे नोंदणी करावी लागेल.
तुमच्या नावावर किती सिम कार्ड जारी केले आहेत हे असे करा चेक
वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर दूरसंचार नियामकाने सिमकार्डशी संबंधित हे नियम लागू केले आहेत. तुमच्या नावावर किती सिम कार्ड जारी केले आहेत हे तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल, तर तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
-सर्वप्रथम संचार साथी पोर्टल https://sancharsaathi.gov.in/ वर जा.
-येथे तुम्हाला Citizen Centric Services चा ऑप्शन मिळेल.
-तेथे TAFCOP वर टॅप करा.
-त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाकून तुम्ही तुमच्या नावाने जारी केलेल्या -सिम कार्डची लिस्ट पाहू शकता.
-तुम्हाला वाटत असेल की यापैकी कोणताही नंबर तुमच्याद्वारे जारी केला गेला नाही, तर तुम्ही तो ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट करू शकता.
