TRENDING:

चोराने SIM कार्ड काढून फेकलं तरी स्मार्टफोन होईल ट्रॅक, करा ही सेटिंग

Last Updated:

Find My Device चं अपडेटेड व्हर्जन सर्व नवीन Android स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. तुम्हाला या फीचरचा खूप जास्त फायदा होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Track Phone Without SIM: फोन चोरी केल्यानंतर चोर लगेच सिम काढून फेकून देतात. जेणेकरून फोनचे लोकेशन ट्रॅक होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, सिम काढून टाकल्यास, फाइंड माय डिव्हाइस ऑप्शन अ‍ॅक्टिव्ह असला तरीही फोन ट्रॅक केला जाऊ शकत नाही. मात्र, या समस्येवर उपाय शोधत गुगलने आता Find My Device फीचर अपडेट केले आहे, ज्यामध्ये तुम्ही आता सिम आणि इंटरनेट कनेक्शनशिवाय तुमचा हरवलेला फोन ट्रॅक करू शकता.
फाइंड माय डिव्हाइस
फाइंड माय डिव्हाइस
advertisement

Find My Device चं अपडेटेड व्हर्जन सर्व नवीन Android स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला या फीचरचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम ताबडतोब अपडेट करा. या नवीन फीचरच्या मदतीने, यूझर्स त्यांच्या Android डिव्हाइसेस जसे की फोन, टॅब्लेट, हेडफोन आणि सिम कार्ड आणि अ‍ॅक्टिव्ह इंटरनेट कनेक्शनशिवाय फोन शोधू शकतात. तुम्ही ते कसे अ‍ॅक्टिव्ह करू शकता हे जाणून घेऊया.

advertisement

Smart TV खरेदी करताना फक्त डिस्प्ले नाही तर पाहा या गोष्टी! होईल फायदा

Find My Device च्या मदतीने ऑफलाइन डिव्हाइस शोधा

आता Find My Device च्या मदतीने ऑफलाइन डिव्हाईस शोधता येतील. यासाठी फाइंड माय डिव्हाईस नेटवर्कमध्ये डिव्हाइस जोडणे आवश्यक असेल.

एकदा तुम्ही एखादे डिव्हाइस जोडल्यानंतर, ते हरवले तर तुम्ही ते दुसऱ्या डिव्हाइसवरून तेच Google अकाउंट वापरून शोधू शकता. या आर्टिकलमध्ये, आपण Find My Device network मध्ये डिव्हाइस जोडण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत-

advertisement

WhatsApp वर तुम्हीही ओळखू शकता बनावट फोटो! या फीचरने होईल काम

Find My Device नेटवर्कमध्ये डिव्हाइस कसे जोडायचे

– फोनमध्ये Find My Device ॲप उघडा आणि तुमच्या Google अकाउंटने साइन इन करा.

- स्क्रीनच्या टॉप राइट कॉर्नरवर प्रोफाइल आयकनवर टॅप करा.

- आता तुम्हाला Find My Device Settings वर टॅप करावे लागेल.

advertisement

- आता Find Your Offline Device वर टॅप करावे लागेल.

- आता with network in all areas सिलेक्ट करावे लागेल.

Find My Device कसे वापरावे

– सर्व प्रथम, तुम्हाला तुमच्या फोनवर तुमच्या Google अकाउंटने साइन इन करावे लागेल आणि Find My Device ॲप उघडावे लागेल.

- आता तुम्हाला जे डिव्हाइस शोधायचे आहे ते स्क्रीनवर सिलेक्ट करावे लागेल.

advertisement

- आता ‘Find nearby’ दिसेल, तुम्हाला त्यावर टॅप करावे लागेल.

- आता नवीन स्क्रीनसह तुम्हाला हरवलेल्या डिव्हाइसची माहिती मिळेल.

- तुम्ही डिव्हाइस जवळ जाताच, रिंग कलरने भरताना दिसेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

- डिव्हाइस जवळपास असल्यास, ॲपच्या मदतीने तुम्ही डिव्हाइसचे लोकेशन देखील जाणून घेऊ शकता.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
चोराने SIM कार्ड काढून फेकलं तरी स्मार्टफोन होईल ट्रॅक, करा ही सेटिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल