इंस्टाग्राम स्टोरी फक्त 24 तास लाइव्ह राहते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंस्टाग्रामचे नवीन फीचर जुन्या स्टोरीज दाखवण्यातही मदत करेल. सर्व काही व्यवस्थित राहिल्यास, तुम्हाला एका सेक्शनमध्ये एक्सपायर्ड झालेल्या स्टोरी पाहण्याची संधी मिळेल. जे काम अद्याप केले गेले नाही ते आगामी फीचर कसे करेल पाहूया.
Flipkart सेलमध्ये अर्ध्या किंमतीत मिळताय 55 इंच Smart TV, चेक करा लिस्ट
advertisement
Instagram चे नवीन फीचर
इंस्टाग्राम नवीन Story Highlights फीचरची टेस्टिंग करत आहे. हे फीचर स्टोरी ट्रेमध्ये फॉलोअर्सच्या एक्सपायर्ड झालेल्या स्टोरी दाखवेल. हा फीडच्या टॉपचा एरिया आहे, जिथे तुम्ही फ्रेंडच्या स्टोरी पाहतात. सध्या, या फीचरची टेस्टिंग सुरू आहे आणि सध्या फारच कमी लोक ते वापरू शकतात.
एक्सपायर्ड स्टोरी दिसतील
लोकांचा अनुभव सुधारण्यासाठी Instagram सतत नवनवीन फीचर्स आणत आहे. स्टोरी हायलाइट्स फीचर देखील याचाच एक भाग आहे.ज्या लोकांची स्टोरी पाहणं राहून जाते त्यांच्यासाठी हे फीचर खूप कामाचे आहे. मात्र हे फिचर फक्त एक आठवडा एक्सपायर्ड स्टोरीज दाखवते.
WhatsApp वर आलंय जबरदस्त फीचर! कॅमेराने लगेच डॉक्यूमेंट होईल स्कॅन
या गोष्टी लक्षात ठेवा
स्टोरी हायलाइट्स फीचरची खास गोष्ट अशी आहे की, ते केवळ म्युच्युअल फॉलोअर्सच्या स्टोरीववर काम करेल. याशिवाय, हायलाइट्स फीचरद्वारे एक्सपायरी झाल्यानंतरही इन्स्टाग्रामवर ज्या स्टोरीज दाखवायच्या आहेत त्या तुम्हाला सेव्ह कराव्या लागतील. सध्या, Instagram ने आगामी फीचरची ऑफिशियली पुष्टी केलेली नाही.
