गॅलॅक्सी रिंग हेल्थ आणि फिटनेस ट्रॅक चोवीस तास करू शकते. स्मार्ट वॉचेस वापरताना हे शक्य होत नाही. कारण, चोवीस तास स्मार्ट वॉच वापरणं शक्य होत नाही. कंपनीने गॅलेक्सी एआय फीचरसह ही रिंग लाँच केली आहे. यामध्ये अनेक एआय फीचर्स उपलब्ध आहेत. युझर्स डीप स्लीप अॅनालिसिस, अॅक्टिव्हिटी मॉनिटरिंग, स्मार्ट सजेशन आणि इतर फीचर्स वापरू शकतील. सॅमसंग गॅलॅक्सी रिंग सध्याची सर्व फीचर्स भविष्यातदेखील कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय देणार आहे. काही ब्रँड रिंगच्या किंमतीसह वार्षिक सबस्क्रिप्शन घेतात आणि नंतर युझर्सना फीचर्सचा अॅक्सेस देतात. सॅमसंग रिंग झोपेचं विश्लेषण आणि झोपेचा स्कोअर, घोरण्याचा डेटा, शरीराचं तापमान आणि इतर मेट्रिक्सची माहिती देईल.
advertisement
सॅमसंग गॅलॅक्सी रिंगमध्ये एआय पॉवर्ड एनर्जी स्कोअर फीचर आहे. ते शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं निरीक्षण करतं. झोप, डेली अॅक्टिव्हिटी, हार्टरेट आणि इतर मेट्रिक्सच्या आधारे हे निरीक्षण केलं जातं.
कंपनीने टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम सिल्व्हर आणि टायटॅनियम गोल्ड या तीन रंगांच्या ऑप्शनसह ही स्मार्ट रिंग लाँच केली आहे. या रिंगची किंमत 38 हजार 999 रुपये आहे. सॅमसंगची अधिकृत वेबसाइट, निवडक रिटेल स्टोअर्स, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून ही रिंग खरेदी करता येईल. सॅमसंग युझर्सना एक सायझिंग किट देणार आहे. त्याच्या मदतीने युझर्स आपली रिंग साइझ ठरवू शकतील. यामुळे योग्य साइझची रिंग ऑर्डर करता येईल. भारतीय मार्केटमध्ये सॅमसंगच्या फोनला चांगली मागणी आहे. युझर्स आता या रिंगला कसा प्रतिसाद देतात, याबाबत उत्सुकता आहे.
