पोको F7 सीरिज चर्चेत असून, पोको F7, पोको F7 प्रो आणि पोको F7 अल्ट्रा अशी तीन मॉडेल्स त्यात असतील, असा अंदाज आहे. लीक्समध्ये असा दावा करण्यात आला आहे, की यातलं पहिलं मॉडेल रेडमी टर्बो 4 प्रो या मॉडेलपासून रीब्रँडेड असेल. पुढची दोन मॉडेल्स रेडमी के 80 आणि के 80 प्रोपासून रीब्रँडेड असू शकतील. अधिकृत घोषणेआधी पोको F7 ची काही प्रमुख स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक झाली आहेत.
advertisement
वेबोवर (Weibo) डिजिटल चॅट स्टेशन या टिप्सटरने केलेल्या दाव्यानुसार, पोको F7 हा फोन 1.5K LTPS AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8s एलिट चिपसेट आणि 7000mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसह येईल. त्याला 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल. नव्या स्नॅपड्रॅगन चिपसेटचा वापर असलेले फोन्स एप्रिल 2025मध्ये येतील, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे पोको F7 देखील त्याच सुमारास येऊ शकतो. पोको F7 प्रो आणि पोको F7 अल्ट्रा ही मॉडेल्स त्याआधी येऊ शकतात.
संभाव्य पोको F7ने BIS सर्टिफिकेशन मिळवलं आहे. त्यामुळे तो भारतात लाँच होणार हे नक्की. त्याचा मॉडेल नंबर 2412DPC0AI असा आहे. हाच फोन आधी GSMA डेटाबेसवरही दिसला होता आणि मार्केटिंग नावाला दुजोरा मिळाला होता. त्याशिवाय सिंगापूरच्या IMDA लिस्टिंगवरून 5G, ब्लूटूथ, वाय-फाय आणि NFC कनेक्टिव्हिटी ऑप्शन्सबद्दलस माहिती मिळाली.
पोको F6 स्मार्टफोन भारतात 2024च्या मे महिन्यात 29,999 रुपयांच्या प्रारंभिक किमतीसह लॉन्च झाला होता. त्यामुळे त्याची पुढची जनरेशन 2025मध्ये याच कालावधीत येऊ शकते, असा अंदाज आहे.
Weiboवर टिप्सटरने स्नॅपड्रॅगन 8s एलिट चिपसेटबद्दल माहिती दिली. त्या चिपसेटची घोषणा अद्याप झालेली नाही. ती स्नॅपड्रॅगन 8 एलिटच्या एक थोड्या अंडरक्लॉक्ड व्हर्जनच्या रूपात येऊ शकते. टिप्सटरचं म्हणणं आहे, की हा चिपसेट स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 पेक्षा जास्त आणि स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 पेक्षा कमी क्षमतेचा असल्याचे संकेत आहेत.
या चिपसेटचे पहिले फोन्स बाजारात एप्रिल 2025मध्ये येतील, असा टिप्सटरचा दावा आहे. 7000mAh आणि त्यापेक्षा मोठ्या बॅटरीचे फोन्स लवकरच येत असल्याचंही त्या टिप्सटरने म्हटलं आहे. फोनच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नसला, तरी X युझर संजू चौधरी यांच्या म्हणण्यानुसार पोको F7 या फोनचा त्यात समावेश असू शकतो.
