Bypass Charging Feature म्हणजे काय?
हे फीचर स्मार्टफोनला बॅटरीमधून पॉवर काढण्याऐवजी पॉवर ॲडॉप्टरमधून थेट पॉवर वापरण्याची परवानगी देते. हे फीचर फोनची बॅटरी जास्त गरम होण्यापासून प्रतिबंधित करते, विशेषत: सुपर-फास्ट चार्जिंगसह हाय-एंड स्मार्टफोनवर, आणि दीर्घ गेमिंग सत्रांमध्ये फोन थंड ठेवण्यास देखील मदत करते.
BSNL चा मोठा प्लॅन! लॉन्च करणार eSIM, पहा कधी होणार उपलब्ध
advertisement
सामान्यत: जेव्हा तुम्ही फोन चार्ज करता, तेव्हा पॉवर प्रथम बॅटरीकडे जाते आणि नंतर ती प्रोसेसर आणि डिस्प्ले सारख्या वेगवेगळ्या घटकांद्वारे काढली जाते परंतु बायपास चार्जिंग मोडमध्ये फोन लॅपटॉप आणि डेस्कटॉप पीसी सारखा काम करतो, जेथे पॉवर थेट वॉल ॲडॉप्टरमधून काढली जाते.
प्रत्येक फोनमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी असते
ब्रँडच्या बेसवर बायपास चार्जिंगची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. Pixel स्मार्टफोन्सवर, डिव्हाइस 80 टक्के चार्ज झाल्यानंतरच बायपास चार्जिंग चालू केले जाऊ शकते. तर Samsung Galaxy S24 Ultra वर असे कोणतेही बंधन नाही, परंतु ते फक्त व्हिडिओ गेम खेळताना चालू केले जाऊ शकते. iQOO 13 वर, कंपनीने डायरेक्ट ड्राइव्ह पॉवर नावाचे हे फीचर सादर केले आहे, जे केवळ व्हिडिओ गेम खेळताना चालू केले जाऊ शकते.
Motorola च्या जबरदस्त स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट! पहा कुठे मिळतोय सर्वात स्वस्त
या यूझर्सने अवश्य वापरावे
Samsung, Google, Asus, iQOO, Infinix आणि Sony मधील निवडक मॉडल बायपास चार्जिंग सुविधा देतात. बायपास चार्जिंग फीचर प्रत्येकासाठी नाही. जे त्यांच्या स्मार्टफोनवर तासन्तास व्हिडिओ गेम खेळतात त्यांच्यासाठी ते उपयुक्त ठरेल, जेथे ते केवळ हिटिंग कमी करू शकत नाही तर टॉप परफॉर्मेंस कायम ठेवण्यातही मदत करु शकते.
स्मार्टफोनवर सतत गेम खेळल्याने खूप उष्णता निर्माण होते. कारण बहुतेक स्मार्टफोनमध्ये अॅक्टिव्ह कूलिंग सोल्यूशन्स नसतात. चार्जिंगमुळे फोनही गरम होतो. म्हणून, चार्जिंग करताना गेम खेळल्याने खूप उष्णता निर्माण होते. ज्याचा कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. बायपास चार्जिंगच्या बाबतीत, वीज थेट कंपोनेंटला सप्लाय केली जाते. ज्यामुळे बॅटरी गरम होण्यापासून प्रतिबंधित होते. या फीचरमुळे फोनचे आयुष्यही काही प्रमाणात वाढते.
