IR Blaster कसे काम करते?
1. IR ब्लास्टरमध्ये IR एमिटर असतो जो इन्फ्रारेड सिग्नल पाठवतो.
2. हा सिग्नल एका विशेष कोडमध्ये एन्कोड केलेला आहे, जो इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे डिटेक्ट केला जातो.
3. जेव्हा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर ॲप वापरून बटण दाबता तेव्हा IR ब्लास्टद्वारे कोड पाठवला जातो.
4. टीव्ही, एसी किंवा इतर उपकरणांमध्ये इन्फ्रारेड रिसीव्हर असतो जो हे कोड समजतो.
advertisement
Jioचे हे 3 प्लॅन BSNL लाही पडले भारी, फक्त 150 रुपयांत दोन महिना कॉलिंग
5. रिसिव्हर कोड्सला वाचून उपकरणाला निर्देश देतो, जसे की चॅनेल बदलणे, आवाज वाढवणे किंवा पॉवर चालू/बंद करणे.
IR ब्लास्टरचे फायदे
रिमोट कंट्रोल - रिमोट कंट्रोल म्हणून आयआर ब्लास्टचा सर्वात जास्त वापर केला जातो. त्याच्या मदतीने फोन युनिव्हर्सल रिमोट म्हणून वापरता येतो. याच्या मदतीने तुम्ही टीव्ही, एसी, डीटीएच सेट टॉप बॉक्स इत्यादी नियंत्रित करू शकता.
Samsung च्या या 5 स्मार्टफोन्सची किंमत घसरली! अगदी स्वस्तात करु शकता खरेदी
एक रिमोट - आयआर ब्लास्टरच्या मदतीने, वेगवेगळ्या उपकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या उपकरणांची गरज भासणार नाही. तुम्ही फोनवरूनच सर्व उपकरणे कंट्रोल करू शकाल.
सुलभता - हे वापरण्यास अगदी सोपे आहे. तुम्ही बसून तुमची वेगवेगळी डिव्हाइस नियंत्रित करू शकाल.
