WhatsApp हॅकिंग
लोकांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. हे हॅकिंग टाळण्यासाठी व्हॉट्सॲपवर एक सेटिंग उपलब्ध आहे. याला टू-स्टेप व्हेरिफिकेशन म्हणतात. हे यूझर्सची सुरक्षा मजबूत करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. पण, काही मोजक्याच लोकांना त्याबद्दल माहिती आहे. म्हणूनच बहुतेक लोक त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक होण्यापासून वाचवायचे असेल तर ते लगेच चालू करा.
advertisement
Jio, Airtel नंतर Vi ने लॉन्च केलं 5G! पहा कोणकोणत्या शहरात चालणार
व्हॉट्सॲपवर ही सेटिंग लगेच चालू करा
1. सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp उघडा.
2. नंतर होम स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन व्हर्टिकल डॉट्सवर क्लिक करा.
3. यानंतर एक पॉप-अप मेनू उघडेल.
4. येथे तुम्ही Settings ऑप्शनवर क्लिक करा.
5. त्यानंतर तुम्ही अकाउंट ऑप्शनवर टॅप करा.
6. यानंतर तुम्हाला Two-step verificationचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.
7. येथे तुम्ही तुमचा पिन सेट करा.
8. तुम्ही तुमचा ई-मेल अॅड्रेस देखील टाकू शकता.
9. यानंतर कोणीही तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट अॅक्सेस करू शकणार नाही.
