Vi Rs 719 Recharge Plan
Vodafone Idea चा 719 रुपयांचा प्लॅन चांगला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1GB डेटा मिळेल. पण एकदा दैनंदिन 1GB डेटा संपला की, तुमचे इंटरनेट स्लो होईल आणि तुम्हाला फक्त 64 Kbps स्पीड मिळेल. यापूर्वी, या प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी, प्रतिदिन 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि Vi Hero Unlimited चे फायदे होते.
advertisement
Smartphoneमध्ये लहान मुलं सोशल मीडिया जास्त वापरताय? लगेच करा ही सेटिंग
एक गोष्ट लक्षात ठेवा की, Vi Hero Unlimited चे फायदे 719 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये मिळणार नाहीत. यापूर्वी हे फायदे या प्लॅनमध्ये उपलब्ध होते. पण 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 12 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी, दररोज अधिक डेटा आणि Vi Hero Unlimited चे फायदे मिळतील. म्हणजेच 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 140 रुपये जास्त द्यावे लागतील, परंतु तुम्हाला अधिक फायदेही मिळतील.
Jio ने सर्वांनाच केलं चकीत! कमी किंमतीत यूझर्सला मिळेल OTT अॅप्सचं सब्सक्रिप्शन
5G सर्व्हिस लवकरच येत आहे
याशिवाय Vodafone Idea देखील लवकरच 5G सेवा सुरू करणार आहे. याआधी जिओ आणि एअरटेलने देशातील अनेक भागात 5जी सेवा सुरू केली आहे. Vodafone Idea गेल्या काही वर्षांपासून 5G टेक्नॉलॉजीवर काम करत आहे आणि आता ते लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, Vodafone Idea मार्चमध्ये 5G सेवा सुरू करेल, जी पहिल्यांदा दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सुरू होईल.
