20फोनवर चॅटिंग लवकर होतं पण वेबवर लोकांना व्हॉट्सअॅप वापरण्यात अडचणी येतात. तर आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅप वेबच्या काही खास कीबोर्ड ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत, या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅप वेब अगदी सहज वापरू शकता.
व्हॉट्सअॅप वेब अनेक सोयीस्कर कीबोर्ड शॉर्टकट देखील ऑफर करतं, जे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. या शॉर्टकट्समुळे तुमचं काम वेगाने होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कीबोर्ड शॉर्टकटबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही काम करताना तुमचा वेळ वाचवू शकता.
advertisement
Ctrl + N: नवीन चॅटसाठी कंट्रोल सोबत N प्रेस करा.
Ctrl + Shift + ]: पुढील चॅटसाठी कंट्रोल सोबत Shift आणि यात दिलेल्या साइनवर प्रेस करा.
Ctrl + Shift + [: मागील चॅटसाठी कंट्रोल सोबत Shift आणि यात दिलेल्या साइनवर प्रेस करा.
Ctrl + E: कॉन्टॅक्ट लिस्टमधून नाव सर्च करण्यासाठी कंट्रोल सोबत E दाबा.
Ctrl + Shift + M: कोणतंही चॅट Mute/unmute करण्यासाठी कंट्रोल सोबत Shift आणि M प्रेस करा.
Ctrl + Backspace: सिलेक्टेड चॅट डिलीट करण्यासाठी कंट्रोल सोबत Backspace दाबा.
Ctrl + Shift + U: चॅट रीड मार्क करण्यासाठी कंट्रोलसोबत Shift आणि U प्रेस करा.
Ctrl + Shift + N: नवीन ग्रुप बनवण्यासाठी कंट्रोल सोबत Shift आणि N प्रेस करा.
व्हॉट्सअॅप वेब कसं कनेक्ट करावं?
- यासाठी सर्वांत आधी तुम्हाला ब्राउझरवर व्हॉट्सअॅप वेबसाइट ओपन करावी लागेल.
- यानंतर, तुम्हाला फोनवरील व्हॉट्सअॅपवर जावं लागेल, सेटिंग्जमध्ये जावं लागेल आणि लिंक्ड Linked Devices वर टॅप करावं लागेल.
- आता तुम्हाला Link a device वर जाऊन QR कोड स्कॅन करावा लागेल.
अशा रितीने तुमचं व्हॉट्सअॅप लॅपटॉप किंवा कॉप्युटरवर लॉग इन करता येतं. तुम्ही तुमचं काम संपल्यानंतर ते लॉगआउट करू शकता.
