ते कसे वापरले जाऊ शकते?
हा एक अतिशय उपयुक्त बदल आहे, विशेषत: ज्यांना चालता फिरता डॉक्यूमेंट लवकरच शेअर करायचे आहेत त्यांच्यासाठी हे फीचर भारी आहे. आता तुम्हाला वेगवेगळ्या ॲप्समध्ये जाण्याची गरज नाही, कारण आता तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करू शकता, त्यात बदल करू शकता आणि ते थेट व्हॉट्सॲपवर शेअर करू शकता.
advertisement
WhatsApp वर कोणी Block केलंय? तरीही त्या व्यक्तीला पाठवा मेसेज, ही आहे ट्रिक
व्हॉट्सॲपवर डॉक्युमेंट शेअर करायला गेल्यावर तुम्हाला 'स्कॅन'चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करताच तुमचा कॅमेरा सुरू होईल. डॉक्यूमेंटचा फोटो घेतल्यानंतर, तुम्ही झटपट प्रिव्ह्यू पाहू शकता आणि आवश्यक असल्यास किरकोळ बदल करू शकता. ॲप आपोआप मार्जिन सेट करतो, परंतु डॉक्यूमेंट योग्य रीतीने दिसण्यासाठी तुम्ही इच्छित असल्यास तुम्ही ते स्वतः सेट करू शकता. तुम्ही समाधानी झाल्यावर, फक्त 'कन्फर्म' आणि तुमचे डॉक्यूमेंट थेट चॅट किंवा ग्रुपवर पाठवले जातील.
1 जानेवारीपासून या Android Smartphones मध्ये बंद होणार व्हॉट्सअॅप! यात तुमचा फोन तर नाही?
प्रिंटरची गरज भासणार नाही
आता तुम्हाला कोणत्याही वेगळ्या स्कॅनिंग ॲप किंवा प्रिंटरची गरज नाही, कारण कागदपत्रे व्हॉट्सॲपमध्येच स्कॅन केली जातात. स्कॅनची क्वालिटीही खूप चांगली आहे, त्यामुळे कागदपत्रे स्वच्छ दिसतात. तुम्ही पावत्या शेअर करत असाल, कॉन्ट्रॅक्ट पाठवत असाल किंवा नोट्स पाठवत असाल, हे फीचर तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
WABetaInfo ने या फीचरविषयी सर्वप्रथम सांगितले होते. जे iOS अपडेटमध्ये आले (आवृत्ती 24.25.80) होते. आता व्हॉट्सॲप हळूहळू सर्व यूझर्ससाठी उपलब्ध करून देत आहे. डॉक्युमेंट शेअरिंग ऑप्शनमधील स्कॅन फीचरसह, व्हॉट्सॲप आता एक संपूर्ण पॅकेज बनले आहे, जिथे तुम्ही सहजपणे संवाद साधू शकता आणि कागदपत्रे शेअर करू शकता. यामुळे यूजर्सचा वेळ वाचतो आणि त्यांना वेगवेगळे ॲप्स वापरावे लागत नाहीत.
