व्हॉट्सॲपच्या अपडेट्स आणि नवीन फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या पोर्टलच्या Wabitinfo नुसार, बीटा यूजर्स हे फीचर वापरू शकतात. यामुळे तुमची सुरक्षा आणखी मजबूत होईल. लोकांना चुकीच्या माहितीपासून वाचवण्यासाठी व्हॉट्सॲपचे नवीन फीचर खूप उपयुक्त ठरू शकते.
Jio ने सर्वांनाच केलं चकीत! कमी किंमतीत यूझर्सला मिळेल OTT अॅप्सचं सब्सक्रिप्शन
व्हॉट्सॲप इमेज सर्च फीचर
advertisement
व्हॉट्सॲपच्या आगामी इमेज सर्च फीचरबद्दल सांगायचे तर, तुम्ही व्हॉट्सॲप चॅटमध्येच ऑनलाइन कोणताही फोटो शोधू शकाल. चॅटमध्ये इमेज उघडा आणि थ्री-डॉट मेनू चिन्हावर टॅप करा. आता तुम्हाला ‘Search on web’ ऑप्शनद्वारे इंटरनेटवर फोटो शोधण्याची सुविधा मिळेल. हे फीचर रिव्हर्स इमेज सर्चप्रमाणे काम करेल.
फोटोबद्दल माहिती मिळेल
तुम्हाला कोणत्याही इमेजबद्दल अधिक माहिती हवी असेल तर ती या फीचरच्या मदतीने मिळू शकते. हे तुम्हाला फोटोचा मूळ स्त्रोत सांगण्यास मदत करेल, जेणेकरून तुम्हाला कळेल की हा फोटो प्रथम कुठे वापरला गेला होता. जर कोणी हेतुपुरस्सर इमेज एडिट केली असेल तर ती ओळखणे सोपे होईल.
बीटा टेस्टर्ससाठी रिलीझ केले
नवीन फीचर यूझर्सना अधिक नियंत्रण देईल, जेणेकरून ते चुकीच्या माहितीपासून स्वतःचे संरक्षण करू शकतील. जेव्हा तुम्हाला बनावट फोटोबद्दल माहिती येते तेव्हा तुम्ही ते शेअर करणे टाळाल. सध्या हे फीचर व्हॉट्सॲपच्या बीटा टेस्टर्ससाठी जारी करण्यात आले आहे. चाचणी दरम्यान सर्व काही व्यवस्थित राहिल्यास, व्हॉट्सॲप हे वैशिष्ट्य प्रत्येकासाठी जारी करू शकते.
