TRENDING:

Thane News: 16 वर्षांची लाडकी लेक, 14 व्या मजल्यावर गेली अन् एका क्षणात सगळं संपलं; ठाण्यातील दुर्दैवी घटना

Last Updated:

Thane News : नैराश्य व्यक्तीला अतिशय टोकाचू भूमिका घेण्यास भाग पाडतो त्या संबंधित एक प्रकरण ठाण्यातून समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : ठाणे शहरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घोडबंदर रोड परिसरातील मोगावापाडा येथील एका सोसायटीत राहणाऱ्या 16 वर्षीय तरुणीने इमारतीच्या 14व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले. या घटनेने परिसरात शोक आणि हळहळ व्यक्त होत आहे.
News18
News18
advertisement

एका लाडक्या लेकीचा असा शेवट का?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी आपल्या कुटुंबासोबत शुभ संकेत सोसायटीत राहत होती. सोमवारी दुपारच्या सुमारास तिने अचानक इमारतीच्या 14व्या मजल्यावरून उडी घेतली. तिच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना ही बाब लक्षात येताच तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

नैराश्यामुळे टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता

advertisement

घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार ती काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी पालकांनी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: 16 वर्षांची लाडकी लेक, 14 व्या मजल्यावर गेली अन् एका क्षणात सगळं संपलं; ठाण्यातील दुर्दैवी घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल