TRENDING:

Mumbai Local: ठाणे- डोंबिवली रेल्वे स्टेशनचा कायापालट, 15 डब्यांच्या लोकल किती दिवसांत सुरू होणार

Last Updated:

मध्य रेल्वेकडून 15 डब्ब्यांच्या लोकलसाठी रेल्वे स्थानकांची रूंदी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये असून लवकरच 15 डब्बे लोकल प्रवाशांच्या सेवेमध्ये रूजू होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण- डोंबिवली: डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांवरून सुटणारी जलद 15 डब्बे लोकलचा आता विस्तार होणार आहे. इतर रेल्वे स्थानकांवरूनही 12 डब्ब्यांच्या ऐवजी 15 डब्बा लोकल प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शनिवार आणि रविवार मध्य रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेतला जात आहे. 15 डब्ब्यांच्या लोकलसाठी मध्य रेल्वेकडून सध्या स्थानकांची रूंदी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये असून लवकरच 15 डब्बे लोकल प्रवाशांच्या सेवेमध्ये रूजू होणार आहे.
News18
News18
advertisement

ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. 1, 2 आणि 3 तर, डोंबिवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. 1A, 1 आणि 2 या स्थानकांचे काम हाती घेण्यात आले होते. आता हे कामं शेवटच्या टप्प्यात आले आहे. लोकलच्या डब्ब्यांमध्ये वाढ केल्यामुळे कायमच रहदारीच्या मार्गावर आता गर्दी आटोक्यामध्ये येण्याची शक्यता आहे. सर्वाधिक गर्दी असणाऱ्या या रेल्वे मार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवर कामादरम्यानचे काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत.

advertisement

विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. 1, 2 आणि 3 तर, डोंबिवली स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. 1A, 1 आणि 2 या स्थानकांचे काम प्रगतीपथावर आहे. 125W पॉइंट काढून टाकणे आणि नवीन बसवणे. नवीन 125W क्रॉसओव्हरला 4- 5 मीटर फिरवून नव्याने टाकलेल्या 150 मीटर प्लेन ट्रॅकशी जोडणे. 7 OHE मास्ट/ पोर्टल काढून टाकणे, सर्व मुख्य केबलिंग हलवणे, ट्रॅक फिरवण्यासाठी आणि विस्तारासाठी जागा तयार करणे. 11 BRN रॅकचा वापर करून स्क्रॅपची लोडिंग आणि अनलोडिंग करणे. हायड्रा/ जेसीबी आणि पोकलेन मशीनचा वापर करून क्रॉसओव्हर 148 A/ B 60 मीटर हलवून काढून टाकणे आणि नवीन बसवणे. पॉइंट 135B, 146A, 148A आणि 148B चे पीसीटीएम मशीन टर्नआउट आणि क्रॉसओव्हर टॅम्पिंग करणे, पॉइंट 149 A/B ची टर्नआउट लॅडर हलवण्यासाठी जागा तयार करणे आणि प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी पुढील जागा तयार करणे. सह अनेक कामे यावेळी केल्याचे त्यांनी सांगितले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुडघ्याच्या वेदनांवर श्रद्धेचा उपाय! पुण्यातलं गुडघेमोडी माता मंदिर, देशभरातून यतात भाविक, Video
सर्व पहा

ठाणे आणि डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या पहिले असणाऱ्या अनेक क्रॉसिंग रूट्स या मेगाब्लॉकच्या काळात नव्याने बसवले आहेत. याचा फायदा रूळ क्रॉसिंगच्या वेळी सर्वाधिक होतोय. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर प्रवाशांची दिवसेंदिवस सर्वाधिक गर्दी वाढताना दिसत आहे. गर्दी वाढत असल्यामुळे अनेक प्रवाशांचे रेल्वेतून खाली पडून जीव जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंब्रा स्थानकाजवळ एका विद्यार्थ्याचा लोकलमधून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गेल्या वर्षी मुंब्रा रेल्वे स्टेशनजवळ लोकलमधील काही प्रवाशांना एक्सप्रेसचा धक्का लागल्यामुळे काही निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला होता. प्रवाशांच्या मृत्यूची घटना आणखी घडू नये, यासाठी रेल्वेकडून लोकलच्या डब्ब्यांमध्ये आणखीन वाढ केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Mumbai Local: ठाणे- डोंबिवली रेल्वे स्टेशनचा कायापालट, 15 डब्यांच्या लोकल किती दिवसांत सुरू होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल