TRENDING:

ST Bus : शिमगोत्सवासाठी एसटीकडून तयारी, ठाण्यातून अतिरिक्त बस; कुठून सुटणार एसटी?

Last Updated:

Holi Special Buses : शिमगोत्सवासाठी तुम्हालाही गावी जायचं आहे तर ठाणे आणि काही जवळच्या शहरातून एसटी मार्फत जास्त बस सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : कोकणातील पारंपरिक शिमगोत्सव आता जवळ आलेला आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात नोकरी किंवा व्यवसायासाठी राहणारे कोकणातील नागरिक दरवर्षी होळीच्या सणासाठी गावाकडे जातात. देवाची पालखी, ग्रामदैवतांची पूजा, पारंपरिक खेळ, फागोत्सव आणि गावातील एकोपा अनुभवण्यासाठी अनेक जण कोकण गाठतात.
75 extra ST buses from Thane to Konkan for Holi
75 extra ST buses from Thane to Konkan for Holi
advertisement

कोकणच्या होळीसाठी एसटीचे मोठे नियोजन

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ठाणे एसटी विभागाने विशेष तयारी केली आहे. ठाणे विभागातील आठ आगारांतून जादा बस सोडण्यात येणार आहेत. बोरीवली आगारातून 17, भाईंदर आगारातून 3, ठाणे खोपट आगारातून 21, कल्याण आगारातून 17 आणि विठ्ठलवाडी आगारातून 21 अशा एकूण 75 जादा बस कोकणासाठी धावणार आहेत.

advertisement

या बस दापोली, खेड, चिपळूण, गुहागर आणि रायगड जिल्ह्यातील महाड या प्रमुख ठिकाणांसाठी असतील. नियमित सेवेव्यतिरिक्त या जादा बस सोडल्या जाणार आहेत. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि वेळेत व्हावा यासाठी रातराणी प्रकारातील बस उपलब्ध असतील. या बसमध्ये टू-बाय-टू आसन व्यवस्था असेल.

कधी पर्यंत करता येणार बुकिंग

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

विशेष बससेवेसाठी आधीच तिकीट बुकिंगची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे.28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान बुकिंग सुरू राहणार आहे. तसेच गटाने प्रवास करणाऱ्यांसाठी ग्रुप बुकिंगची स्वतंत्र सुविधा देण्यात आली आहे. मात्र सध्या एकाही बसचे ग्रुप बुकिंग झालेले नाही अशी माहिती ठाणे एसटी विभागाने दिली.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
ST Bus : शिमगोत्सवासाठी एसटीकडून तयारी, ठाण्यातून अतिरिक्त बस; कुठून सुटणार एसटी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल