महापालिकेने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात पुढे सांगण्यात आले आहे की, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे हाती घेण्यात आलेल्या पाइपलाइनच्या कामामुळे हा व्यत्यय निर्माण झाला आहे. आनंद नगर ते साकेतपर्यंत उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात आलेले आहे. बांधकामाच्या दरम्यान, इंदिरा नगर पंपिंग स्टेशनला पाणीपुरवठा करणारी, आधीपासून अस्तित्वात असलेली 813 मिमी व्यासाची रायझिंग मेन पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे.
advertisement
दुरुस्ती आणि रिपेयरिंगचा भाग म्हणून, एमएमआरडीएने एकूण आवश्यक असलेल्या 2200 मीटरपैकी 520 मीटर लांबीची 900 मिमी व्यासाची नवीन पाईपलाईन टाकली आहे. जुन्या पाइपलाइनमधून नवीन पाइपलाइनमध्ये पाणी व्यवस्थित पुढे जाण्यासाठी, प्रशासनाकडून आंतरजोडणीचे काम हाती घेतले जाईल, ज्यासाठी पाणीपुरवठा तात्पुरता स्थगित करणे आवश्यक आहे. हा पाणीपुरवठा शुक्रवार, 27 मार्च रोजी सकाळी 09:00 वाजता बंद होईल आणि जो दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 28 मार्च रोजी, सकाळी 09:00 वाजेनंतर सुरू होईल. तब्बल 24 तास ठाणेकरांना पाणी नसणार आहे.
इंदिरा नगर, साठे नगर, आंबेवाडी, डवळे नगर, सावरकर नगर, लोकमान्य नगर (पाडा क्रमांक 2, 3 आणि 4), चैत्ती नगर, परेरा नगर, झांजे नगर, श्रीनगर, किसन नगर, शिवटेकडी, शांती नगर, वारवाडी, शांती नगर, किसन नगर, आंबेवाडी, साठे नगर, वारकरी नगर या भागांचा समावेश आहे. पाडा, रामनगर, सीपी तलाव, येूर परिसर आणि जवळपासचे परिसर या परिसरामध्ये पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढचे एक ते दोन दिवस नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना किमान दोन ते तीन दिवस पुरेल तितका पाणी पुरवठा करून ठेवावा लागणार आहे. शिवाय, पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.
