TRENDING:

कल्याण स्टेशनवर महिलांची 'दादागिरी'! तरुणीचे केस ओढले, बेदम मारले अन् धावत्या लोकलबाहेर ढकलले

Last Updated:

घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून संबंधित महिलांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
ठाणे : मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकावरून बदलापूरकडे जाणाऱ्या लोकलमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. महिलांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या एका तरुणीला काही महिला प्रवाशांनी बेदम मारहाण करत तिचे केस ओढून तिला जबरदस्तीने लोकलमधून खाली उतरवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून संबंधित महिलांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्थानकावरून लोकल सुटत असताना एका तरुणीचा तोल जाऊन ती गाडीत पडली. याच कारणावरून काही महिला प्रवाशांनी संतप्त होत त्या तरुणीवर शिवीगाळ करत मारहाण सुरू केली, पाहता पाहता हा वाद विकोपाला गेला. तीन ते चार महिलांनी एकत्र येत तरुणीचे केस ओढले, तिला लाथाबुक्क्यांनी मारले आणि अखेर तिला लोकलमधून खाली फेकून दिले. ही संपूर्ण घटना स्थानकावरील काही प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली असून, त्यातील दृश्ये अत्यंत धक्कादायक आहेत.

advertisement

लोकलमधील गर्दी, गडबड आणि तणावपूर्ण वातावरण यामुळे या घटनेवेळी इतर प्रवासी सुरुवातीला हस्तक्षेप करू शकले नाहीत. मात्र, काही वेळाने काही प्रवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. संबंधित तरुणीला गंभीर दुखापत झाली नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या प्रकारामुळे ती मानसिकदृष्ट्या हादरून गेल्याचे सांगितले जात आहे.

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 

advertisement

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) आणि स्थानिक पोलिसांनी दखल घेत तपास सुरू केला आहे. व्हिडिओच्या आधारे आरोपी महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या स्वतंत्र डब्यातच अशा प्रकारची हिंसक घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

advertisement

प्रवाशांमध्ये संतापाची भावना 

दरम्यान, प्रवाशांमध्ये संतापाची भावना असून, रेल्वे प्रशासनाने लोकलमधील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी आणि  अशा घटनांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. ही घटना केवळ एका तरुणीवरील अन्याय नसून, सार्वजनिक वाहतुकीतील वाढत्या असुरक्षिततेचे गंभीर द्योतक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.  या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Holi 2026 : 2 की 3 मार्च? यंदा होळी नेमकी कधी साजरी करावी? शुभ मुहूर्त काय?
सर्व पहा

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: "अजितदादांचा विमान अपघात हा घातपात?" रोहित पवारांचा थेट FIR चा इशारा, केंद्रातील 'या'मंत्र्याचं नाव घेतलं!

मराठी बातम्या/ठाणे/
कल्याण स्टेशनवर महिलांची 'दादागिरी'! तरुणीचे केस ओढले, बेदम मारले अन् धावत्या लोकलबाहेर ढकलले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल