कोल्हापूर शहरात भीषण अपघात झाला आहे. एका चारचाकी गाडीने तीन दुचाकींना उडवले असून त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. इतर गंभीर जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.