TRENDING:

वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेचा एअरस्ट्राईक, मिलेट्री एअरबेसपासून काहीच नाही सोडलं, या 10 ठिकाणांना केलं टार्गेट

Last Updated:

अमेरिका आणि वेनेझुएला संघर्षात काराकससह १० ठिकाणी एअर स्ट्राईक, निकोलस मादुरो यांनी आणीबाणी जाहीर केली, जागतिक तणाव वाढला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एकामागोमाग एक एअर स्ट्राईक करण्यात आले आहेत. 7 ठिकाणांना स्पेशल टार्गेट करण्यात आलं असून 10 जागांवर अक्षरश: बॉम्बचा वर्षाव केला आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच युद्धाची स्थिती पुन्हा उभी राहणार का याची भीती देखील आहे. अमेरिका आणि वेनेझुएल यांच्यातील संघर्षानं नवं वळण घेतलं आहे.
News18
News18
advertisement

अमेरिकेने वेनेझुएलाची राजधानी काराकससह अनेक प्रमुख शहरांवर हवाई हल्ले केल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी केला. या हल्ल्यानंतर मादुरो यांनी संपूर्ण देशात इमर्जन्सी घोषित केली, जागतिक पातळीवर सध्या प्रचंड तणावाची स्थिती आहे.

पहाटेच्या सुमारास बॉम्बवर्षाव, राजधानी हादरली

शनिवारी पहाटे काराकस शहरात एकापाठोपाठ एक सात जोरदार स्फोट झाले. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या माहितीनुसार, पहाटेच्या अंधारात आकाशात लढाऊ विमाने घोंघावताना दिसली आणि त्यानंतर लष्करी तळांच्या दिशेने बॉम्बफेक करण्यात आली. या स्फोटांमुळे काराकसमधील इमारती हादरल्या असून शहरात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. विशेषतः दक्षिण भागातील एका मोठ्या लष्करी तळाजवळ झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला.

advertisement

ट्रम्प प्रशासनाकडून कारवाईचे आदेश?

रिपोर्टनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच वेनेझुएलावर या लष्करी कारवाईचे आदेश दिल्याची जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही आठवड्यांपासून निकोलस मादुरो यांच्यावर दबाव वाढवला होता. मादुरो हे अंमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारीच्या माध्यमातून अमेरिकेत घुसखोरी करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.

इंधन साठ्यावरून मादुरो यांचा प्रत्यारोप

advertisement

दुसरीकडे, निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे हे सर्व आरोप फेटाळून लावले. "अमेरिका केवळ वेनेझुएलाला आपली वसाहत बनवण्याचा प्रयत्न करत असून, त्यांना आपल्या देशातील अफाट इंधन आणि खनिज साठ्यांवर कब्जा मिळवायचा आहे," असा दावा मादुरो यांनी केला आहे. २०२४ च्या निवडणुकांपासूनच अमेरिका आणि वेनेझुएला यांच्यातला संघर्ष टोकाला पोहोचत असल्याचं दिसून आलं. अखेर संयम सुटला आणि स्फोट झाला.

advertisement

वेनेझुएलात आणीबाणी घोषित

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि तुरीच्या दरात उलथापालथ, सोयाबीनची कशी राहीली स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

हल्ल्याची तीव्रते पाहता मादुरो सरकारने अधिकृत निवेदन जारी करून अमेरिकन आक्रमणाचा तीव्र निषेध केला आहे. कराकससह मिरांडा, अरगुआ आणि ला गुइरा या राज्यांमध्येही स्फोट झाले आहेत. "अशा प्रकारच्या धमक्यांना वेनेझुएला डगमगणार नाही," असे म्हणत मादुरो यांनी तात्काळ राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे. दरम्यान, अमेरिकेने अद्याप अधिकृतपणे या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

मराठी बातम्या/विदेश/
वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेचा एअरस्ट्राईक, मिलेट्री एअरबेसपासून काहीच नाही सोडलं, या 10 ठिकाणांना केलं टार्गेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल