TRENDING:

डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाचं टेन्शन वाढवलं! रातोरात हार्मुझबाबत घेतला मोठा निर्णय

Last Updated:

होर्मुझ समुद्रधुनीवर इराणची नाकेबंदी, तेल पुरवठा विस्कळीत, डोनाल्ड ट्रम्प होर्मुझवर नियंत्रण आणि जहाजांवर टोल वसुलीची योजना, तणाव वाढला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
होर्मुझची समुद्रधुनी ही जगासाठी सर्वात महत्त्वाची आहे. भारतासाठी तर सर्वात जास्त, त्याचं कारण असं की भारतात 80 टक्के इंधनसाठा हा या समुद्रधुनीमधून येतो. इराणने होर्मुझवर कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेविरुद्ध झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेतला. आता अमेरिकेनं देखील जगाचं टेन्शन वाढवलं आहे. अमेरिका देखील होर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारणार असल्याची माहिती मिळाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प
advertisement

"आमच्याकडे एक अशी कल्पना आहे, ज्यामुळे आम्ही होर्मुजच्या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांकडून टोल घेऊ शकतो," अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना केलेलं हे विधान सध्या जागतिक राजकारणात चर्चेचा विषय ठरलं. इराणने होर्मुझचा मार्ग बंद केल्यामुळे जगभरातील तेल आणि गॅसची पुरवठा साखळी विस्कळीत झाली असतानाच, ट्रम्प यांनी आता या मार्गावर अमेरिकेचं नियंत्रण मिळवण्याचे संकेत दिले आहेत.

advertisement

इराणचं अस्त्र आणि अमेरिकेचं स्वप्न

होर्मुझवर सध्या इराणचं एकछत्र वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी अमेरिकेकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्यात अद्याप यश आलेलं नाही. ट्रम्प यांच्या मते, इराणसोबत होणाऱ्या कोणत्याही शांतता करारात 'होर्मुझमधून तेलाचा मुक्त प्रवाह' हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असायला हवा. अमेरिका केवळ हा मार्ग उघडू इच्छित नाही, तर भविष्यात तिथून जाणाऱ्या जहाजांवर स्वतःचा ताबा मिळवून 'टोल' वसूल करण्याची रणनीती आखत आहे.

advertisement

४ तासांची डेडलाईन

इराणला देण्यात आलेल्या डेडलाईनबद्दल बोलताना ट्रम्प यांनी आपल्या लष्करी शक्तीचे प्रदर्शन केले. "आमच्याकडे इतकी ताकद आहे की, अवघ्या ४ तासांत इराणचे सर्व पूल आणि वीज प्रकल्प आम्ही मातीमोल मिळवू शकतो. पण आम्हाला इराण उद्ध्वस्त करायचा नाहीये, कारण ते पुन्हा उभं करायला दशकं लागतील," असं ट्रम्प म्हणाले. पण इराण जर झुकलं नाही तर ट्रम्प कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत देखील असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेतून स्पष्ट सांगितलं.

advertisement

खामेनेईंचा मृत्यू आणि होर्मुझची नाकेबंदी

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केला होता, ज्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून हे युद्ध अधिक तीव्र झाले आहे. प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझची नाकेबंदी केली, ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. इराणसाठी होर्मुझ हे जगाला झुकवण्याचं सर्वात मोठं हत्यार ठरत आहे.

advertisement

शांतता करार का रखडला?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

सध्या सुरू असलेल्या वादात इराण आणि अमेरिका दोघेही मागे हटायला तयार नाहीत. अमेरिकेला होर्मुझवर नियंत्रण हवं आहे, तर इराणला आपल्या हक्काचा हा मार्ग कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नाहीये. जोपर्यंत होर्मुझच्या मालकीहक्काचा आणि वापराचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत हे युद्ध थांबणं सध्याच्या घडीला तरी कठीण दिसत आहे. तर डोनाल्ड ट्रम्प इराणवर मोठे हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचं देखील सांगत आहेत.

मराठी बातम्या/विदेश/
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाचं टेन्शन वाढवलं! रातोरात हार्मुझबाबत घेतला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल