ढाका येथील एवरकेयर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लिव्हर सिरोसिस, हृदयविकार आणि मधुमेहासारख्या अनेक व्याधींशी त्या झुंज देत होत्या, मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली.
खालिदा जिया 20 हून अधिक दिवसांपासून ढाका येथील रुग्णालयात दाखल होत्या. २३ नोव्हेंबर रोजी त्यांना हृदय आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर देश-विदेशातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे ६ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
advertisement
खालिदा जिया यांचा राजकीय प्रवास एखाद्या सिनेमातल्या ट्विस्टपेक्षा कमी नाही. त्यांनी १९९१ ते १९९६ आणि पुन्हा २००१ ते २००६ अशा दोन वेळा बांगलादेशचे पंतप्रधानपद भूषवले. त्यांचे पती आणि माजी राष्ट्रपती जिया-उर-रहमान यांच्या हत्येनंतर त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. मात्र, २०१८ मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, त्यानंतर त्यांनी बराच काळ हा नजरकैदेत काढला.
खालिदा जिया यांना 8 फेब्रुवारी २०१८ रोजी ढाका इथल्या स्पेशल कोर्टने जिया अनाथालय ट्रस्टच्या नावाने सरकारी पैशांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपात 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्यांच्या मुलाला तारिक आणि अन्य 5 जणांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा त्यानंतर पुन्हा 10 वर्ष वाढवण्यात आली होती.
शेख हसीना यांनी जेव्हा देश सोडला तेव्हा जिया यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर चांगले उपचार मिळावे म्हणून त्या लंडनला गेल्या होत्या तिथे 4 महिने उपचार घेतले आणि 6 मे रोजी त्या पुन्हा मायदेशी परतल्या. मात्र अचानक त्यांना मागच्या काही दिवसांपासून त्रास होऊ लागल्याने ढाका इथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आज सकाळी 6 च्या सुमारास त्यांचं निधन झालं.
