धमकीचा मेसेज आणि तातडीने निर्णय
विमानातील क्रू मेंबर्सना कथितरित्या एक संदेश प्राप्त झाला होता, ज्यामध्ये विमानात स्फोटक उपकरण ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, वैमानिकाने लगेचच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना म्हणून सुरक्षा यंत्रणांना सज्ज करण्यात आले आणि विमानाला हैदराबादऐवजी अहमदाबादकडे वळवण्यात आले.
advertisement
विमान अहमदाबादमध्ये सुरक्षितपणे उतरवल्यानंतर लगेचच सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. कोणतीही जोखीम न घेता, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, सीआयएसएफ, पोलीस आणि विमानतळ सुरक्षा पथकांनी तात्काळ कारवाई सुरू केली. त्यांनी संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आणि विमानाची कसून तपासणी सुरू केली. तपासणीनंतर ए.सी.पी. व्ही. एन. यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, "विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात आली आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही." या घोषणेनंतर विमानातील प्रवाशांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठा दिलासा व्यक्त केला. ही केवळ एक खोटी धमकी होती, हे स्पष्ट झाले.
