रविवारी जोहान्सबर्गजवळील बेकरसडल टाउनशिपमध्ये झालेल्या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला आणि 10 जण गंभीर जखमी झाले. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या आणखी एका अंदाधुंद गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाल्याने आता देशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, जोहान्सबर्गच्या नैऋत्येस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेकर्सडाल परिसरात ही घटना घडली.
advertisement
परवान्याशिवाय चालणाऱ्या एका बारजवळ झाला. अचानक अज्ञात हल्लेखोरांनी रस्त्यावर असलेल्या लोकांवर गोळीबार केला. कोणतंही कारण नसताना काही निष्पाप लोकांना टार्गेट करण्यात आलं. गौतेंग प्रांतील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी पुढे सांगितले की मृत कोण आहेत किंवा त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी सांगितले की हल्ल्याचा हेतू अजून अस्पष्ट आहे आणि कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हे ठिकाण सोन्याच्या खाणींजवळ आहे, तपास अजूनही हा हल्ला खाणकामांशी किंवा गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित आहे की नाही याबाबत सध्या चौकशी सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेत ही दुसरी घटना घडली आहे. याआधी 7 डिसेंबर रोजी प्रिटोरियाजवळील सोल्सविले टाउनशिपमध्ये एका वसतिगृहात गोळीबार झाला होता. त्या हल्ल्यात तीन वर्षांच्या मुलासह 11 लोक ठार झाले आणि 14 जण जखमी झाले होते.
