Asteroid 2012 PZ17 असं या लघुग्रहाचं नाव असून, तो 30 ऑगस्ट रोजी पृथ्वीच्या सर्वांत जवळ असेल, असं भाकीत नासा या संस्थेने वर्तवलं होतं. पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याला Near Earth Asteroid (NEA) असं म्हटलं जातं. अंतराळातला हा मोठा खडक म्हणजेच लघुग्रह पृथ्वीच्या खूप जवळ येणार असला, तरी तो पृथ्वीवर धडकणार नसल्याचंही नासाने स्पष्ट केलं होतं. तो पृथ्वीपासून सुमारे 64 लाख किलोमीटर अंतरावरून जाणार होता. त्याचा ताशी वेग 12,895 किलोमीटर्स एवढा असून, तो जवळून जाणार असला, तरी पृथ्वीसाठी धोकादायक नसल्याचं नासाने स्पष्ट केलं होतं. हा लघुग्रह केवळ 50 फूट रुंदीचा असल्याने एखाद्या घराएवढाच असेल. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. 30 ऑगस्ट 2023 रोजी हे संकट पृथ्वीच्या जवळून निघून गेलं, 'हिंदुस्तान टाइम्स'ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
advertisement
(काय आहे इस्रोचं ‘सूर्य मिशन’, सूर्याच्या किती जवळ जाणार आदित्य L1?)
नासाने दिलेल्या माहितीनुसार, Asteroid 2023 NP हा लघुग्रह अॅस्टरॉइड्सच्या एटेन ग्रुपमधला आहे. हा ग्रुप पृथ्वीजवळून जाणाऱ्या लघुग्रहांचा आहे. त्यांचा सेमी-मेजर अॅक्सिस पृथ्वीपेक्षा लहान असतो. त्यांना asteroid 2062 Aten च्या नावावरून नाव दिलं जातं. अशा प्रकारचा पहिला लघुग्रह अमेरिकी खगोलशास्त्रज्ञ एलॅनोर हेलिन यांनी 7 जानेवारी 1976 रोजी पालोमार ऑब्झर्व्हेटरीमधून शोधला होता.
डायनोसॉर्सना नामशेष केलेला लघुग्रह
लुईस आणि वॉल्टर अल्वारेझ यांनी 1980 साली सांगितलेल्या सिद्धांताला दी अल्वारेझ हायपोथेसिस असं म्हणतात. त्यात असं मांडलं होतं, की 65 दशलक्षहून अधिक वर्षांपूर्वी एक लघुग्रह पृथ्वीला धडकला. त्यामुळे डायनोसॉर या पृथ्वीवरून नामशेष झाले. त्या धडकेमुळे मेक्सिकोत मोठं विवर तयार झालं असं मानलं जातं; मात्र तो पृथ्वीवर कसा आला, या संदर्भातली नवीन माहिती संशोधनातून हाती लागली आहे. इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ ब्रायन कॉक्स यांच्या म्हणण्यानुसार, तो लघुग्रह आपल्या सौरमालेतल्या गुरू ग्रहामुळे फेकला गेला होता. त्याच्या आघातामुळे 140 किलोमीटरचं विवर तयार झालं. गुरू हा एवढा मोठा ग्रह आहे, की तो जगाची निर्मिती आणि विध्वंसाचं कारण असू शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
त्या लघुग्रहामुळे मेक्सिकोतल्या युकॅटन पेनिनसुलामध्ये मोठं विवर तयार झालं असून, त्या लघुग्रहाच्या धडकेमुळे डायनोसॉर्ससह जगातले 70 टक्के प्राणी नामशेष झाले, असं म्हटलं जातं. त्याशिवाय, 2 अब्ज वर्षांपूर्वीचं व्ह्रेडेफोर्ट क्रेटर, 1.8 अब्ज वर्षांपूर्वीचा सॅडबरी बेसिन इम्पॅक्ट आणि 500 दशलक्ष वर्षांपूर्वीचे क्लिअरवॉटर लेक्स क्रेटर्स हे सारे लघुग्रहाच्या पृथ्वीला झालेल्या धडकांचेच परिणाम आहेत.
