TRENDING:

Bat Interesting Facts : वटवाघळं उलटी का लटकतात? ते झोपेत देखील खाली का पडत नाहीत?

Last Updated:

वटवाघळांमुळे विषाणू पसरू शकतात, असं अनेकांना वाटतं; पण वटवाघूळ उलटं का लटकतं, ते जमिनीवरून का उडू शकत नाही, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत आहेत का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 13 डिसेंबर : वटवाघूळ या प्राण्याबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते. कारण वटवाघळांबाबत आपल्या समाजात अनेक समजुती, अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. वटवाघळांबद्दलची माहिती जाणून घेणं रंजक ठरेल. वटवाघूळ आणि इतर प्राणी-पक्ष्यांमधला फरक म्हणजे ते झाडाला उलटं लटकतं. तसंच ते अंधारात उडू शकतं. वटवाघळांबद्दल काही मनोरंजक माहिती जाणून घेऊ.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

बर्‍याच जणांना वटवाघळांबद्दल जुजबी माहिती असते. वटवाघळांमुळे विषाणू पसरू शकतात, असं अनेकांना वाटतं; पण वटवाघूळ उलटं का लटकतं, ते जमिनीवरून का उडू शकत नाही, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत आहेत का? वटवाघळांबद्दल अशा न सापडलेल्या प्रश्नांबाबत माहिती करून घेऊ. वटवाघूळ हा जगातला सर्वांत अद्वितीय प्राणी का आहे तेही यामुळे समजेल. वाळवंटात, तसंच बर्फाळ दक्षिण ध्रुवावर वटवाघूळ हा प्राणी आढळतो. दोन्ही ठिकाणच्या तापमानात बराच फरक असूनही वटवाघूळ दोन्हीकडे कसा काय आढळतं, अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची, तर त्याचा इतिहास जाणून घ्यावा लागेल.

advertisement

वटवाघूळ हे खूप आधीपासून पृथ्वीवर आहे. अगदी डायनासोरच्या युगाच्या आधीपासून ते पृथ्वीवर अस्तित्वात होतं. सर्वांत जास्त तापमान असलेल्या वाळवंटातही ती आढळतात आणि अगदी थंड ध्रुवीय प्रदेशातही दिसतात. त्यांच्याकडे काही आश्चर्यकारक क्षमता आहेत. मेक्सिकन वटवाघळं काही फूट उंचीपर्यंत उडू शकतात. लहान तपकिरी वटवाघळं शीत निद्रा घेऊ शकतात. जवळपास एक तास वटवाघूळ श्वास घेत नाही, असं जाणवू शकतं. मासे पकडणाऱ्या वटवाघळांमध्ये एक विशिष्ट सेन्सर असतो. त्यामुळे इतर प्राण्यांच्या तुलनेत ते पटकन मासे ओळखू शकतात. त्यांचे पंख माणसाच्या केसांसारखे पातळ व बारीक असतात. वटवाघळं फक्त काळ्या रंगाचीच नसतात. होंडुरन नावाची वटवाघळं पांढरी असतात. त्यांचं नाक पिवळं असतं.

advertisement

इतर पक्ष्यांप्रमाणे, वटवाघळांना जमिनीवरून उडता येत नाही. कारण त्यांचे पंख उंच जाण्यासाठी त्यांना पुरेसं बळ देत नाहीत. त्यांचे मागचे पाय इतके लहान आणि अविकसित असतात, की ती धावू शकत नाहीत आणि वेग मिळवू शकत नाहीत. तेच उलटं लटकल्यामुळे त्यांना सहज उडणं शक्य होतं. वटवाघळं सामान्यपणे अंधाऱ्या ठिकाणी दिवसभर झोपतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. गुहांमध्ये वगैरे वटवाघळं जास्त दिसतात. झोपलेली असली, तरी ती खाली पडत नाहीत. कारण वटवाघळांच्या पायातल्या नसा इतक्या योग्य प्रकारे तयार झालेल्या असतात, की त्यांच्या वजनामुळेच त्यांना पंजांच्या साह्यानं घट्ट धरून ठेवण्यास मदत मिळते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

वटवाघळांची रचना वातावरणानुसार झालेली असते. त्यामुळे प्रत्येक भागातली वटवाघळं वेगवेगळे असतात. काही वटवाघळांची फर अंगोरासारखी लांब असते. ती लाल, काळी आणि पांढरी होते. थायलंडच्या भौंरा वटवाघळाचं वजन सगळ्यात कमी असतं. इंडोनेशियामध्ये आढळणारी वटवाघळं 6 फुटांपर्यंत पंख पसरू शकतात. लॅटिन अमेरिकेत आढळणाऱ्यांपैकी 70 टक्के वटवाघळं फक्त रक्त पितात. कॅनडामध्ये आढळणारी वटवाघळं कीटक खातात.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Bat Interesting Facts : वटवाघळं उलटी का लटकतात? ते झोपेत देखील खाली का पडत नाहीत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल