मुझफ्फरपुर : गेल्या काही दिवसांत अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. तसेच लग्नाचे आमिष देऊन फसवणूक केल्याच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक समोर येत आहेत.
लग्नाच्या तीन दिवसांनी पत्नी आपल्या पतीला सोडले आणि आपल्या बॉयफ्रेंडसोबत फरार झाली. यावेळी तिचा नवरा घरात झोपला होता. पती झोपेत असताना या नववधूने 1 लाख 30 हजार रुपयांचे दागिने आणि 50 हजार रुपये कॅश घेऊन फरार झाली. जेव्हा पतीचा डोळा उघडला तेव्हा त्याला आपली पत्नी दिसली नाही. यानंतर तिचा शोध घेतला मात्र, ती मिळून आली नाही. तिच्या माहेरीही याबाबत कल्पना देण्यात आली. दरम्यान, पत्नीने आपल्या प्रियकराला घरी बोलावले होते आणि ती त्याच्यासोबत पळून गेली अशी माहिती तिच्या पतीला मिळाली.
advertisement
ही घटना मुझफ्फरपुरच्या साहेबगंज येथील आहे. बबलू कुमार असे पतीचे नाव आहे. तर मनीषा असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. बबलू कुमार हा बासुदेवपूर सराय येथील रहिवासी आहे. तर मनीषा ही गौखुला दीवान येथील रहिवासी आहे. 12 जुलै रोजी दोघांचे लग्न झाले. मात्र, लग्नानंतर नववधूने जे केले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रियकराशी फोनवर बोलायची -
याप्रकरणी तिच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्याने म्हटले की, लग्नानंतर त्याची पती सतत तिच्या प्रियकरासोबत फोनवर बोलत होती. त्याने विरोध केल्यावरही तिने ऐकले नाही. 15 जुलैच्या रात्री घरी पाहुणे आले होते. पाहुणे गेल्यावर आम्ही रात्री झोपले. मात्र, यानंतर गुपचूप त्याची पत्नी मनीषा हिने आपल्या माहेरी राहणारा प्रियकर याला सासरी बोलावले आणि त्याच्यासोबत फरार झाली. तसेच आपल्यासोबत 1 लाख 30 हजार रुपयांचे दागिने आणि 50 हजार रुपये रोख रक्कमही लंपास केली. तिचा भरपूर शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप ती मिळून आली नाही.
जेवताना दररोज येतायेत केस, कशाचा आहे हा संकेत? एखादं मोठं संकट तर येणार नाही ना?
लग्न आपल्या मर्जीने केलं होतं का?
बबलूने पुढे सांगितले की, त्याचे लग्न 23 डिसेंबरला ठरले होते. याचवर्षी होळीलासुद्धा मला एका अज्ञात नंबरवरुन कॉल आला. या मुलीसोबत लग्न करू नकोस अन्यथा तुला जीवे ठार मारू अशी धमकी मला त्यावेळी देण्यात आली. यावेळी मी ही माहिती होणाऱ्या सासूला दिली होती. त्यानंतर लग्नाआधी सासूने माझी भेट आपल्या मुलीशी घालून दिली.
त्यावेळी मी तिला तु स्वेच्छेने लग्न करत आहेस की कुणाच्या दबावात हे लग्न करत आहे, असे विचारले होते. तर मी माझ्या स्वेच्छेने लग्न करत आहे, अशी माहिती तिने दिली होती, असे त्याने सांगितले. दरम्यान, आता ती आपल्या प्रियकरासोबत फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.