जेवताना दररोज येतायेत केस, कशाचा आहे हा संकेत? एखादं मोठं संकट तर येणार नाही ना?

Last Updated:

जेवण करताना काही घटनांमुळे शुभ-अभुश घटनांचे मोठे संकेतही मिळतात, हे अनेकांना माहिती नसेल. पण ही बाब खरी आहे. जेवणात पुन्हा पुन्हा केस मिळणे, हासुद्धा तुमच्या आयुष्याशी संबंधित एक संकेत आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी
अयोध्या : हिंदू धर्मात जेवणाचे विशेष असे महत्त्व आह. कबीरदासही म्हणतात की, ज्याप्रकारचे अन्न तुम्ही खाल, त्याचप्रकारचे मन राहील. तसेच ज्याप्रकारे तुम्ही पाणी प्याल तशीच तुमची वाणी राहील. म्हणजे शुद्ध-सात्त्विक आहार आणि पवित्र जलच्या मदतीने मन आणि वाणी पवित्र होते. तसेच ज्याप्रकारे जो ज्या संगतीमध्ये असतो, तो तसाच बनतो. यामुळे शास्त्रात जेवणाचे असे विशेष महत्त्व सांगितले आहे आणि जेवणाबाबत काही नियमही सांगितले आहेत.
advertisement
जेवण करताना काही घटनांमुळे शुभ-अभुश घटनांचे मोठे संकेतही मिळतात, हे अनेकांना माहिती नसेल. पण ही बाब खरी आहे. जेवणात पुन्हा पुन्हा केस मिळणे, हासुद्धा तुमच्या आयुष्याशी संबंधित एक संकेत आहे. त्यामुळे हा संकेत नेमका काय आहे, याचा मानवाच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो, हे जाणून घेऊयात.
अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जेवताना जर तुम्हाला केस दिसले तर अशुभ मानले जाते. हिंदू धर्मातील मान्यतेनुसार, जर तुम्हाला जेवणादरम्यान, पुन्हा पुन्हा केस मिळत आहे किंवा जर असे तुमच्यासोबत पुन्हा पुन्हा घडत असेल तर असे अन्न अजिबात खाऊ नये. यामुळे घरात किंवा तुमच्या आयुष्यात राहूचा प्रभाव वाढत आहे, मान्यता अशी आहे.
advertisement
100 वर्षे जुनी सरकारी शाळा, पण महत्त्वाच्या विषयांना शिक्षक नाही, 1992 पासून मुख्याध्यापक पदही रिक्त; धाराशिवमधील धक्कादायक वास्तव
पंडित कल्कि राम पुढे सांगतात की, जेवणात पुन्हा पुन्हा केस निघणे हे पितृदोषाचेही संकेत आहेत. तसेच तुम्ही जर जेवणाला बसले असाल आणि लगेच तुम्हाला केस दिसले किंवा पहिल्या घासातच केस जर समोर आले तर हे पितृदोषाचे संकेत आहेत. ज्या घरात पितृ दोष असतो, त्याठिकाणी जेवण तयार करताना किंवा जेवताना समस्या निर्माण होतात, असे मानले जाते.
advertisement
रेल्वेमधील घुसखोरी थांबवण्यासाठी प्रशासनाचा मोठा निर्णय, प्रवाशांसाठी या मार्गावर वाढवल्या कमी पल्ल्याच्या गाड्या
पंडित कल्कि राम यांनी पुढे बोलताना सांगितले की, जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर तुम्ही त्वरित राहू आणि पितृ दोष संबंधित उपाय करावा. सोबतच जेवताना केस बांधूनच जेवण करावे. तसेच जेवण वाढताना पुन्हा पुन्हा हातातून पडणे, जेवताना कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणे किंवा जेवण करताना कोणतीही अशुभ बातमी मिळणे हे शुभ मानले जात नाही, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
सूचना – ही बातमी ज्योतिषांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
जेवताना दररोज येतायेत केस, कशाचा आहे हा संकेत? एखादं मोठं संकट तर येणार नाही ना?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement